ETV Bharat / business

इंधनात दरवाढीचा पुन्हा भडका; दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर ८७ रुपयांहून अधिक

पेट्रोलचे दर २०२१ मध्ये प्रति लिटर ३.५९ रुपयांनी तर डिझेलचे दर ३.६१ रुपयांनी वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वर्षभरानंतर पहिल्यांदाच प्रति बॅरल ६० डॉलरहून अधिक झाले आहेत.

इंधन दरवाढ
इंधन दरवाढ
author img

By

Published : Feb 9, 2021, 3:07 PM IST

नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलचे दर मंगळवारी पुन्हा भडकले आहेत. दरवाढीत तीन दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर ३५ पैशांनी वाढले आहेत.

दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर ८७.३० रुपये आहेत. तर मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर ९३.८३ रुपये आहेत. दिल्लीत डिझेलचे दर प्रति लिटर ७७.४८ रुपये तर मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर ८४.३६ रुपये आहेत. यापूर्वी ५ फेब्रुवारीला इंधनाचे दर ३० पैशांनी वाढले होते.

हेही वाचा- फ्युचर-रिलायन्स रिटेलच्या सौद्यावरील 'जैसे थे'चे आदेश न्यायालयाकडून स्थगित

पेट्रोलचे दर २०२१ मध्ये प्रति लिटर ३.५९ रुपयांनी तर डिझेलचे दर ३.६१ रुपयांनी वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वर्षभरानंतर पहिल्यांदाच प्रति बॅरल ६० डॉलरहून अधिक झाले आहेत. कोरोनाविरोधातील लसीकरणाची भारतासह विविध देशांमध्ये असलेली मोहिम आणि मागणीत झालेली वाढ या कारणांनी कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत.

हेही वाचा-व्होडाफोनच्या कराबाबत सिंगापूरच्या उच्च न्यायालयात भारताकडून याचिका दाखल

मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी-

आंतरराष्ट्रीय बाजारात मागणीच्या तुलनेत पुरवठ्यात तफावत असल्याने कच्च्या तेलाचे दर वाढल्याचे गेल्या आठवड्यात हिंदुस्थान पेट्रोलियमचे प्रमुख मुकेश कुमार सुराणा यांनी सांगितले होते. किरकोळ पेट्रोल व डिझेलचे २५ ते ३० टक्के दर हे किमतीवर तर उर्वरित दर हे राज्य व केंद्राच्या करावर अवलंबून असल्याचेही सुराणा यांनी सांगितले. सरकारने कररचना पाहू शकते. आमच्यापुढे दरवाढीचा भार ग्राहकांवर लादण्याशिवाय पर्याय नाही, असेही त्यांनी म्हटले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.