नवी दिल्ली - आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्या आहेत. आज डिझेलच्या दरात 15-21 पैशांची वाढ झाली आहे, तर पेट्रोलच्या दरात 31-39 पैशांची वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये प्रेटोलचे भाव 101.54 तर डिझेलचा दर 89.87 वर पोहचला आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत 107.54 आणि डिझेलची किंमत 97.45 वर पोहचली आहे. तर भोपाळमध्ये पेट्रोल सर्वांत महाग असून 109.89 प्रतिलीटर मिळत आहे. तर कोलकातामध्ये 93.02 एवढी किंमत आहे.
गेल्या दीड महिन्यांपासून इंधन दरात सातत्याने वाढ झाल्यानंतर आता पेट्रोल आणि डिझेलचे दर विक्रमी पातळीवर आहेत. याशिवाय देशातील अनेक शहरांमध्ये किंमती पेट्रोलचे दर 108 रुपयांच्या पुढे गेले आहेत. तर मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 107 रुपये आहेत. गेल्या 4 मेपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सतत वाढ होत आहे.
महत्त्वाच्या शहरांमधील पट्रोल आणि डिझेलच्या किमती -
शहर | पेट्रोल रुपये/लीटर | डिझेल रुपये/लीटर |
मुंबई | 107.54 | 97.45 |
हैदराबाद | 105.52 | 97.96 |
बंगळुरू | 104.94 | 95.26 |
चेन्नई | 102.23 | 94.39 |
कोलकाता | 101.74 | 93.02 |
नवी दिल्ली | 101.54 | 89.87 |
गुरुग्राम | 99.17 | 90.47 |
नोएडा | 98.73 | 90.34 |
लखनऊ | 98.63 | 90.26 |
चंडीगढ | 97.64 | 89.5 |
भोपाळ | 109.89 | 98.67 |
रीवा | 112.11 | 100.72 |
श्रीगंगानगर | 112.9 | 103.15 |
आग्रा | 98.32 | 89.96 |
जयपूर | 108.4 | 99.02 |
पटणा | 103.91 | 95.51 |
अनूपपुर | 112.47 | 101.05 |
इंदौर | 109.97 | 98.76 |
पेट्रोल-डिझेलचे दर सकाळी 6 वाजता ते अद्यावत -
पेट्रोल-डिझेलचे दर सकाळी 6 वाजता ते अद्यावत होतात. तुम्हाला एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलचे दररोजचे दर तपासू शकता. इंडियन ऑईल ग्राहक आरएसपी स्पेस पेट्रोल पंपचा कोड 9224992249 या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 या क्रमांकावर पाठवल्यास माहिती मिळवू शकतात. तर एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.