मुंबई - शेअर बाजार खुला होताना निर्देशांक ४०० अंशांनी वधारला. तर एचडीएफसी ट्विन्स, इन्फोसिस आणि जागतिक बाजारातील सकारात्मक स्थितीने शेअर बाजार निर्देशांक वधारला आहे.
निफ्टीचा निर्देशांक हा सकाळच्या सत्रात १९.१० अंशांनी घसरून ९,२८५.८५ वर पोहोचला.
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर
एचडीएफसी बँकचे सर्वाधिक ४ टक्क्यांहून अधिक शेअर वधारले आहेत. एचडीएफसीने मार्चच्या तिमाहीत ७ हजार २८०.२२ कोटींचा नफा मिळविला आहे. इन्फोसिस आज तिमाहीची वित्तीय कामगिरी जाहीर करणार आहे. इन्फोसिसचे शेअर ३ टक्क्यांहून अधिक वधारले आहेत. कोटक बँक, एचडीएफसी, टेक महिंद्रा, एचसीएल टेक आणि टीसीएसचे शेअर वधारले आहेत. अॅक्सिस बँक, पॉवरग्रीड, एनटीपीसी, इंडसइंड बँक आणि आयटीसीचे शेअर घसरले आहेत.
दरम्यान, टाळेबंदी असली तरी शेअर बाजारासह वित्तीय संस्थांचे कामकाज सुरू आहे. ग्रीन झोनच्या ठिकाणी काही अटींवर उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मुंबई शेअर बाजार शुक्रवारी ९८६.११ अंशांनी वधारून ३१,५८८.७२ वर स्थिरावला होता. तर निफ्टीचा निर्देशांक २७३.९५ अंशांनी वधारून ९,२६६.७५ वर स्थिरावला होता.