नवी दिल्ली - अफगाणिस्तानासह इतर देशांमधून आयात करूनही कांद्याचे दर कमी झाले नाहीत. ग्राहकांना दिलासा देण्याकरता सरकारी संस्था एमएमटीसी आणखी १२ हजार ५०० टन कांदा तुर्कीमधून मागविणार आहे.
ग्राहक व्यवहार विभागाच्या अंतर्गत किंमत स्थिर निधी व्यवस्थापन समिती (पीएसएफएमसी) कार्यरत आहे. या समितीने एमएमटीसीला कांदे आयातीचे कंत्राट काढण्याचे आदेश दिले आहेत. एमएमटीसीने १२ हजार ५०० टन कांदा आयात करण्याचे कंत्राट दिले आहे. त्यामुळे आयातीचे एकूण प्रमाण ४२ हजार ५०० टनांवर पोहोचल्याचे एमएमटीसीने म्हटले आहे.
हेही वाचा-#Video: लग्नसमारंभातील मित्राने दिलेले गिफ्ट पाहून नववधूला हसू आवरे ना
नुकतेच कंत्राटातून आयातीने मागविलेला कांदा देशात जानेवारीच्या मध्यात पोहोचणार आहे. देशात ३१ डिसेंबरपूर्वी सुमारे १२ हजार टन कांदा पोहोचणार असल्याचे एमएमटीसीने म्हटले आहे. हा कांदा मागणीप्रमाणे राज्यांतील विविध बाजारपेठेत पाठविला जाणार असल्याचे एमएमटीसीने म्हटले आहे. कांदे आयातीनंतर किमती कमी होतील व बाजारात कांदा उपलब्ध होईल, असेही सरकारी संस्थेने म्हटले आहे.
हेही वाचा-दिल्ली : घाऊक बाजारपेठेत विक्रमी दर; कांद्याचे दर प्रति किलो २०० रुपयांहून वाढणार
असे आहेत देशातील कांद्याचे दर-
देशांमधील बहुतांश शहरात प्रति किलो १०० रुपये दराने कांदा विकण्यात येत आहे. तर देशाच्या काही भागात कांदा प्रति किलो १६० रुपयाने विकण्यात येत आहे. दिल्लीत प्रति किलो कांद्यासाठी ग्राहकांना ११८ रुपये मोजावे लागत आहेत.
हेही वाचा-अवकाळी पाऊस अन् कांद्याच्या विक्रमी दरामुळे यंदा कांदा रोपांचे दरही भिडले गगनाला
हे आहे दरवाढीचे कारण-
गतवर्षीच्या खरीप हंगामाच्या तुलनेत यंदा कांदे उत्पादनात सुमारे २५ टक्के घसरण झाल्याचा अंदाज आहे. यंदा कांदे उत्पादनात अग्रेसर असलेल्या कर्नाटक, महाराष्ट्र राज्यांना उशिरा आलेला मान्सून आणि अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यामुळे कांदे उत्पादनात कमालीची घसरण झाली आहे.
कांदे दरवाढीवर नियंत्रण राहण्यासाठी सरकारकडून उपाययोजना-
केंद्र सरकारने घाऊक व किरकोळ विक्रेत्यांवर कांदे साठ्यावर मर्यादा घालून दिलेली आहे. तसेच देशातील बाजारपेठेत मुबलक उत्पादन राहावे, यासाठी कांदे निर्यातीवर निर्बंध घातले आहेत.