मुंबई - शेअर बाजाराच्या चौथ्या सत्रातही तेजी कायम आहे. मुंबई शेअर बाजाराने निर्देशांकाचा नवा उच्चांक गाठला आहे. आयटीसी, एसबीआय आणि कोटक बँकेचे शेअर वधारले आहेत.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ३५८.५४ अंशाने वधारून ५०,६१४.२९ वर स्थिरावला. निफ्टीचा निर्देशांक १०७.५० अंशाने वधारून १४,८९५.६५ वर स्थिरावला.
हेही वाचा- तिसऱ्या तिमाहीत स्टेट बँकेच्या नफ्यामध्ये ७ टक्क्यांची घसरण
या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर-
- आयटीसीचे शेअर ६ टक्क्यांनी वधारले आहेत. त्यापाठोपाठ स्टेट बँक ऑफ इंडिया, बजाज फायनान्स, ओएनजीसी, एम अँड एम, कोटक बँक, अल्ट्रा टेक सिमेंट, एनटीपीसी आणि बजाज फिनसर्व्हचे शेअर वधारले आहेत.
- तर दुसरीकडे एशियन पेंट्स, इंडसइंड बँक, भारती एअरटेल, टेक महिंद्रा आणि टायटनचे शेअर घसरले आहेत.
केंद्रीय अर्थसंकल्पात धाडसी निर्णय गेण्यात आल्याने शेअर बाजार गुंतवणुकदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे रिलायन्स सिक्युरिटीजचे मुख्य रणनीतिकार विनोद मोदी यांनी सांगितले. देशातील बाजाराने भांडवली मुल्याचा २०० लाख कोटी रुपयांचा टप्पा आज ओलांडला आहे. बँका, सार्वजनिक बँका आणि एफएमसीजीच्या शेअरमध्ये अधिक खरेदी दिसून आल्याचे मोदी यांनी सांगितले. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर ०.०९ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ५८.७४ डॉलर आहेत.
हेही वाचा-सेबीकडून किशोर बियानीसह त्यांचे बंधु अनिल यांच्यावर एका वर्षाची बंदी