ETV Bharat / business

शेअर बाजार निर्देशांकात ५४.६१ अंशाची घसरण; निराशाजनक आर्थिक आकडेवारीचा परिणाम - शेअर बाजार निर्देशांक

किरकोळ बाजारपेठेतील महागाईने ऑक्टोबरमध्ये गेल्या १६ महिन्यातील उच्चांक गाठला आहे. जागतिक बाजारपेठेतील वातावरणही नकारात्मक आहे. अशा स्थितीत शेअर बाजार निर्देशांक घसरला आहे.

संग्रहित - शेअर बाजार
author img

By

Published : Nov 14, 2019, 12:25 PM IST

मुंबई - शेअर बाजार निर्देशांक सकाळच्या सत्रात ५४.६१ अंशाने घसरून ४०,६१.४५ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक हा ३३.२० अंशाने घसरून ११,८०७.२५ वर पोहोचला. किरकोळ बाजारपेठेतील वाढलेली महागाई आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील नकारात्मक स्थितीने शेअर बाजार निर्देशांकात घसरण झाली आहे.

घाऊक बाजारपेठेतील महागाईची आकडेवारी आज जाहीर होणार आहे. याकडे गुंतवणुकदारांचे लक्ष लागलेले आहे.

हेही वाचा-अमेरिकेच्या बंदीनंतरही हुवाईची चांगली कामगिरी; कर्मचाऱ्यांना देणार २०४४ कोटींचा बोनस

या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले शेअर-
भारती एअरटेल, इंडसंइंड बँक, टाटा मोटर्स, स्टेट बँक ऑफ इंडिया, टाटा स्टील, ओएनजीसी आणि एचयूएलचे शेअरिंगचे ३.३४ टक्क्यांनी शेअर घसरले. इन्फोसिस, येस बँक, एशियन पेंट्स आणि मारुतीचे शेअर हे २.१३ टक्क्यांनी वधारले. मुंबई शेअर बाजार बुधवारी २२९.०२ अंशाने घसरून ४०,११६.०६ वर स्थिरावला होता. तर निफ्टीचा निर्देशांकही ११,८४०.४५ वर स्थिरावला होता.

विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी ५८४.९२ कोटींच्या शेअरची भांडवली बाजारामधून बुधवारी खरेदी केली. तर देशातील गुंतवणूकदार संस्थांनी ८९०.०३ कोटींच्या शेअरची विक्री केली.

हेही वाचा-केंद्रीय अर्थसंकल्प २०२०' ची तयारी : कराबाबत वित्त मंत्रालयाने मागविल्या सूचना

अशी आहे देशातील आर्थिक स्थिती-

किरकोळ बाजारपेठेतील महागाईने गेल्या १६ महिन्यातील उच्चांक गाठला आहे. या महागाईची ऑक्टोबरमध्ये ४.६२ टक्के नोंद झाली आहे. चालू महिन्यात राष्ट्रीय सकल उत्पन्नाची आकडेवारी (जीडीपी) जाहीर होणार आहे. दुसऱ्या तिमाहीतील जीडीपी हा ५ टक्क्यांवरून कमीच राहिल, असा अंदाज स्टेट बँक ऑफ इंडिया आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला आहे.

Intro:Body:

Dummy Business News

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.