मुंबई - सलग पाच दिवस सुरू असलेल्या शेअर बाजार निर्देशांकातील घसरणीला आज ब्रेक लागला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ६४२ अंशाने वधारला आहे.
मुंबई शेअर बाजार उघडताना निर्देशांक घसरला होता. मात्र, त्यानंतर शेअर बाजाराने यु टर्न घेतल्याने दिवसाखेर शेअर बाजाराचा निर्देशांक ६४१.७२ अंशाने वधारून ४९,८५८.२४ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक १८६.१५ अंशाने वधारून १४,७४४ वर स्थिरावला.
हेही वाचा-बीएमडब्ल्यूचेही येणार इलेक्ट्रिक मॉडेल; चालू वर्षात आय फोर होणार लाँच
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर
एनटीपीसीचे शेअर सुमारे ४ टक्क्यापर्यंत वधारले आहेत. त्यापाठोपाठ एचयूएल, पॉवरग्रीड, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट आणि बजाज फायनान्सचे शेअर वधारले आहेत. एल अँड टी, टेक महिंद्रा, बजाज ऑटो आणि टायटनचे शेअर घसरले आहेत.
हेही वाचा-लशीचे दुष्परिणाम झाल्यास आरोग्य विमा योजनेतून उपचार शक्य-आयआरडीएआय
रिलायन्स सिक्युरिटीजचे प्रमुख रणनीतीकार विनोद मोदी म्हणाले की, जागतिक बाजारात नकारात्मक स्थिती असतानाही शेअर बाजाराचा निर्देशांक आज वधारला आहे. एफएमसीजी, औषधे, धातू आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्यामुळे शेअर बाजार निर्देशांक वधारण्यास मदत झाली आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर १.३६ टक्क्यांनी वधारून प्रति बॅरल ६४.१४ डॉलर आहेत.