नवी दिल्ली - शेअर बाजारातील घसरणीचा गुंतवणुकदारांना मोठा फटका बसला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 1939.32 अंशाने घसरला आहे. गेल्या दहा महिन्यांमधील ही शेअर बाजारातील सर्वाधिक मोठी घसरण आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांनी सुमारे 5.3 लाख कोटी रुपये गमाविले आहेत.
शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे भांडवली मूल्य हे दिवसाखेर 5,37,375.94 कोटी रुपयांवरून 2,00,81,095.73 कोटी रुपये झाले आहे. या सर्व कंपन्यांचे भांडवली मूल्य हे 25 फेब्रुवारीला 2,06,18,471.67 कोटी रुपये आहे.
हेही वाचा- ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाहीत जीडीपीत ०.४ टक्क्यांची वाढ
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर 1939.32 अंशाने घसरून 49,099.99 वर स्थिरावला. निफ्टीचा निर्देशांक 568.20 अंशाने घसरून 14,529.15 वर स्थिरावला. ही एका दिवसातील गतवर्षी 23 मार्चपासून सर्वात मोठी घसरण झाली आहे. क्षेत्रनिहाय बँकिंग निर्देशांकांमध्ये सर्वाधिक 4.8 टक्क्यांची घसरण झाली आहे. वित्तीय कंपन्यांच्या निर्देशांकात 4.9 टक्के तर दूरसंचार कंपन्यांच्या निर्देशांकात 3.85 टक्के घसरण झाली आहे.
हेही वाचा-'वित्तीय क्षेत्रात विश्वासासह पारदर्शकता जपण्याला सर्वोच्च प्राधान्य'