ETV Bharat / business

लक्ष्मी विलास बँकेच्या शेअरमध्ये २० टक्क्यांनी घसरण; लोअर सर्किटहून कमी किंमत

सलग तिसऱ्या सत्रात लक्ष्मी विलास बँकेचे शेअर घसरले आहे. तिन्ही सत्रात एकूण ३६ टक्क्यांनी लक्ष्मी विलास बँकेच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. कॅनरा बँकेचे माजी अकार्यकारी संचालक टी. एन. मनोहरन यांची लक्ष्मी विलास बँकेच्या प्रशासकपदी निवड झाली आहे.

लक्ष्मी विलास बँक
लक्ष्मी विलास बँक
author img

By

Published : Nov 19, 2020, 1:59 PM IST

नवी दिल्ली - लक्ष्मी विलास बँकेचे शेअर २० टक्क्यांनी घसरले आहेत. ही घसरण लोअर सर्किटहून अधिक आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने लक्ष्मी विलास बँकेवर एक महिन्याचे निर्बंध घातले आहेत. त्याचा बँकेच्या शेअरला फटका बसला आहे.

सलग तिसऱ्या सत्रात लक्ष्मी विलास बँकेचे शेअर घसरले आहे. तिन्ही सत्रात एकूण ३६ टक्क्यांनी लक्ष्मी विलास बँकेच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. कॅनरा बँकेचे माजी अकार्यकारी संचालक टी. एन. मनोहरन यांची लक्ष्मी विलास बँकेच्या प्रशासकपदी निवड झाली आहे. लक्ष्मी विलास बँक आणि डीबीएस बँकेच्या एकत्रीकरणाचा आराखडाही आरबीआयने वेबसाईटवर दिला आहे.

लोअर सर्किट म्हणजे काय?

एका ठराविक किंमतीपेक्षा कमी दराला शेअर विकण्यावर बंदी घालण्यात येते. त्यामुळे शेअर बाजारामध्ये जास्त पडझड होत नाही. .

आरबीआयचे लक्ष्मी विलास बँकेवर निर्बंध

आर्थिक संकटात सापडलेल्या लक्ष्मी विलास बँकेवर आरबीआयने निर्बंध लादले आहेत. १६ डिसेंबरपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. या निर्बंधानुसार बँकेच्या खातेदारांना महिनाभरासाठी केवळ २५ हजारांची रोख रक्कम काढता येणार आहे. जूनच्या तिमाहीत ११२ कोटी रुपयांचा तोटा आणि सप्टेंबरच्या तिमाहीत ३९७ कोटींचा तोटा दर्शविणाऱ्या लक्ष्मीविलास बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बंधने घालण्यात आलेली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सतत बिघडणारी बँकेची आर्थिक परिस्थिती आणि संचालक मंडळाकडून करण्यात आलेले निष्फळ प्रयत्न यामुळे हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. एकूण ३० दिवसांसाठी हे निर्बंध राहणार आहेत.

मुंबई शेअर बाजारात १९.७६ टक्क्यांनी घसरून लक्ष्मी विलास बँकेच्या प्रति शेअरची किंमत ९.९५ रुपये आहे. निफ्टीत लक्ष्मी विलास बँकेच्या शेअरची किंमत १० रुपये आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.