गुरुग्राम – सॅमसंग गॅलक्सी एम 31 एस हा 6 ऑगस्टपासून बाजारपेठेत आणि ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. यामध्ये 8 जी+128 जीबीची मेमोरीची क्षमता आहे. ग्राहकांना 21 हजार 499 रुपयांना हा स्मार्टफोन खरेदी करणे शक्य होणार आहे.
भारतीय ग्राहकांनी कमी कालावधीत गॅलक्सी एम हा ब्रँड यशस्वी केल्याबद्दल कृतज्ज्ञ असल्याचे सॅमसंग इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष असीम वारसी यांनी म्हटले आहे. सॅमसंग गॅलक्सी एम 31 एस हा मध्यम श्रेणीच्या स्मार्टफोनमध्ये कॅमेराच्या कामगिरीत नवा टप्पा गाठणार असल्याचा त्यांनी दावा केला.
ही आहेत सॅमसंग गॅलक्सी एम 31 ची वैशिष्ट्ये
- एसएमओएलईडी इन्फिटीचा ओ डिस्प्ले आहे.
- आयएमएक्स 682 हा नवा सेन्सर असलेला शक्तिशाली क्वाड कॅमेरा आहे.
- स्मार्टफोनला प्रिमियम ग्रेडियंट डिझाईन आहे.
- सॅमसँग गॅलक्सी एम 31मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप असलेला 64 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे.
- तर 6000 एमएएचची दणकट बॅटरी आहे.
- फिंगरप्रिंटचे स्कॅनर आहे.
- एकाच प्रयत्नात योग्यवेळी रेकॉर्डिंग करण्यासाठी कॅमेरामध्ये खास सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दहा सेकंदापर्यंत फुटेज घेवून ते वापरता येते. त्यासाठी कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेचा वापर केलेले तंत्रज्ञानाचे नवे व्हर्जन आहे. विशेष म्हणजे ही सुविधा पुढील आणि मागे असलेल्या दोन्ही कॅमेरांसाठी वापरता येते.
दरम्यान, चिनी कंपन्यांवर बहिष्काराची मागणी होत असताना सॅमसंगने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भारतीय बाजारपेठेवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.