नवी दिल्ली - गुंतवणुकदारांच्या संपत्तीत आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 90,82,057.95 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तर या आर्थिक वर्षात शेअर बाजार निर्देशांक हा 68 टक्क्यांनी वधारला आहे.
मुंबई शेअर बाजाराने कोरोनाच्या संकटातही अभूतपूर्व तेजी अनुभवली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक वर्षभरात 20,040.66 अंशाने वधारला आहे. शेअर बाजारासाठी हे आर्थिक वर्ष रोलर कोस्टर ठरले आहे.
हेही वाचा- आर्थिक वर्षाखेर शेअर बाजारात 627 अंशाची पडझड
- कोरोना महामारीमुळे शेअर बाजारावर परिणाम झाला होता. मात्र, त्यामधून शेअर बाजार सावरला होता. त्यामुळे शेअर बाजार गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला आहे.
- शेअर बाजारामधील सूचीबद्ध कंपन्यांचे भांडवली मूल्य हे चालू आर्थिक वर्षात 90,82,057.95 कोटी रुपयांवरून 2,04,30,814.54 रुपये झाले आहे.
- शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांचे भांडवली मूल्य हे 3 मार्चपर्यंत सर्वाधिक म्हणजे 2,10,22,227.15 कोटी रुपये होते.
- जिओजीट फायनान्शियल इन्व्हेस्टमेंटचे मुख्य रणनीतीकार व्ही. के. विजयकुमार म्हणाले की, कोरोनाविरोधातील लशीमुळे बाजारात आशा निर्माण झाली आहे. जगभरातील शेअर बाजार निर्देशांक नोव्हेंबरमध्ये वधारला आहे. तर वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी गुंतवणूक केली आहे.
हेही वाचा- फेसबुकसह गुगल समुद्रमार्गे इंटरनेट केबलचा करणार विस्तार
दरम्यान, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर 627.43 अंशाने घसरून 49,509.15 वर स्थिरावला. मागील आर्थिक वर्षात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 9,204.42 अंशाने वधारला होता.