नवी दिल्ली - शेअर बाजार निर्देशांक सलग दुसऱ्या सत्रात विक्रमी उसळी घेत असल्याने गुंतवणूकदार मालामाल झाले आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीला फायदा झाल्याने त्यांच्या संपत्तीत एकूण 10.50 लाख कोटींची भर पडली आहे. अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सरकारने कॉर्पोरेट करात कपात केली आहे. त्याचा परिणाम म्हणून शेअर बाजारात उत्साहाची लाट आली आहे.
कॉर्पोरेट करात कपात झाल्याने कंपन्यांच्या नफ्यात वाढ होणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदार अधिक परतावा मिळविण्याच्या आशेने शेअरची खरेदी मोठ्या प्रमाणात करत आहेत. त्याचा परिणाम म्हणून शेअर बाजार निर्देशांक उसळी घेत आहे.
हेही वाचा-आठवडाभरात पेट्रोल १.६० रुपयाने महागले! सलग सातव्या दिवशी दरवाढ सुरूच
शेअर बाजार शुक्रवारी 1,331.39 अंशाने वधारून 39,346.01 वर पोहोचला. या दिवशी एकाच दिवसात वधारण्याचा शेअर बाजाराने गेल्या 10 वर्षातील विक्रम मोडला. शेअर बाजार 5.32 टक्क्यांनी अथवा 1, 921.15 अंशाने वधारला होता.
हेही वाचा-या आठवड्यात तीन दिवसच बँक चालू राहणार; २६ व २७ सप्टेंबरला बँक कर्मचाऱ्यांचा संप
शेअर बाजारामध्ये सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे भांडवली मूल्य हे 6 लाख 82 हजार 938.6 कोटींवरून 1 कोटी 45 लाख 37 हजार 378.01 रुपये झाले. एकाच दिवसात शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांच्या भांडवली मूल्यात 7 लाख कोटींची शुक्रवारी भर पडली होती.
हेही वाचा- शेअर बाजाराची १३०० अंशाची उसळी; निर्देशांकाने गाठली पुन्हा ३९,००० ची पातळी
सूचिबद्ध कंपन्यांचे भांडवली मूल्य 10 लाख 53 हजार 495.23 कोटी रुपयावरून 1 कोटी 49 लाख 5 हजार 246.57 कोटी रुपये झाले. केवळ दोन दिवसात कंपन्यांचे भांडवली मूल्य वाढल्याने गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.