नवी दिल्ली - शेअर बाजारात विक्रीचा दबाव असल्याने सलग सहाव्या सत्रात निर्देशांकात घसरण झाली आहे. शेअर बाजार गुंतवणुकदारांच्या संपत्तीत ११,५७,९२८.५४ कोटी रुपयांची घसरण झाली आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ५८८.५९ अंशाने घसरून ४६,२८५.७७ वर स्थिरावला. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात २१ जानेवारीपासून घसरण सुरू आहे. या सहा दिवसांमध्ये शेअर बाजाराच्या निर्देशांकात ३,५०६.३५ अंशाने घसरण झाली आहे. भांडवली बाजारामधील सूचीबद्ध कंपन्यांचे भांडवली मूल्य हे ११,५७,९२८.५४ कोटी रुपयांवरून १,८६,१२,६४४,०३ कोटी रुपये झाले आहे.
हेही वाचा-पतमानांकन संस्थांनी सार्वभौम मानांकनासाठी अधिक पारदर्शक व्हावे- आर्थिक सर्वेक्षण
जिओजीट फायनान्शियल सर्व्हिसेसचे प्रमुख संशोधक विनोद नायर म्हणाले की, अर्थव्यवस्था सुधारण्याचा वेग कमी आहे. जागतिक बाजारात नकारात्मक स्थिती आहे. त्यामुळे अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारावर मोठो परिणाम होत आहे.
हेही वाचा-कोरोनापूर्वीच्या स्थितीला येण्यासाठी अर्थव्यवस्थेला दोन वर्षे लागणार-आर्थिक सर्वेक्षण
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर
डॉ. रेड्डीज, मारुती, भारती एअरटेल, बजाज ऑटो, इन्फोसिस आणि टीसीएसचे शेअर हे ५.६९ टक्क्यांनी घसरले. तर दुसरीकडे इंडसइंड बँक, सन फार्मा, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँकेचे शेअर ५.४४ टक्क्यांनी वधारले आहेत.
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत आज आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला आहे. अर्थमंत्री १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत.