नवी दिल्ली - महामारी 'कोविड-१९' चा शेअर बाजार गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. गुंतवणूकदारांनी सकाळच्या सत्रात ६.२५ लाख कोटी रुपये गमाविले आहेत. शेअर बाजारात सकाळच्या सत्रात २,१८२.४१ अंशांनी घसरण झाली आहे.
कोविड-१९ च्या वाढत्या प्रसाराने अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार असल्याची शेअर बाजार गुंतवणूकदारांनी भीती आहे. त्यामुळे शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात शेअरची विक्री करण्यात आली आहे. शुक्रवारनंतर मुंबई शेअर बाजारात पुन्हा घसरण झाली आहे. बीएसई-३० मध्ये सूचिबद्ध असलेल्या इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि अॅक्सिस बँकेचे शेअर ९.३ टक्क्यापर्यंत घसरण झाली आहे.
हेही वाचा-जीएसटी १२ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर.. मोबाईलच्या किमती वाढणार
शेअर बाजारामध्ये सर्वाधिक भांडवली मूल्य असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये ३ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. त्यामुळेही शेअर बाजार निर्देशांकात घसरण झाली आहे. सर्वच क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. गेला आठवडाभरात मुंबई शेअर बाजारात एकूण ३,४७३.१४ अंशांनी घसरण झाली आहे.
हेही वाचा-'येस बँक' प्रकरणी अनिल अंबानींना 'ईडी'कडून समन्स!हेही वाचा-