नवी दिल्ली - शेअर बाजार निर्देशांकातील घसरणीचा गुंतवणुकदारांना मोठा फटका बसला आहे. शेअर बाजार गुंतवणुकदारांच्या संपत्तीत आज ३.२७ लाख कोटींची घट झाली आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ८७१.१३ अंशाने घसरून ४९,१८०.३१ वर स्थिरावला. या घसरणीनंतर शेअर बाजारात सूचिबद्ध कंपन्यांचे भांडवली मूल्य हे ३,२७,९६७.७१ कोटी रुपयांवरून २,०२,४८,०९४.१९ कोटी रुपये झाले आहे.
जिओजीट फायनान्शियल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले की, कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने शेअर बाजार अस्थिर राहिला आहे. जागतिक बाजारातील नकारात्मक स्थितीचाही शेअर बाजारावर परिणाम झाला आहे.
हेही वाचा-वाधवान पिता-पुत्रांचा आणखीन कारनामा उघडकीस; सीबीआयकडून गुन्हा दाखल
या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर
एम अँड एमचे सर्वाधिक सुमारे ३.९७ टक्क्यांनी शेअर घसरले. त्यापाठोपाठ स्टेट बँक ऑफ इंडिया, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, आयटीसी आणि एल अँड टीचे शेअर घसरले आहेत. एशियन पेंट्स आणि पॉवरग्रीड या आघाडीच्या केवळ दोन कंपन्यांचे शेअर वधारले आहेत.
हेही वाचा-एका बिटकॉईनवर खरेदी करता येणार टेस्ला; एलॉन मस्क यांची घोषणा
मेटल, ऑटो, बँक, इंडस्ट्रीयल आणि फायनान्स या क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर २.९३ टक्क्यापर्यंत घसरले आहेत. शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या २,११५ कंपन्यांचे शेअर घसरले आहेत. तर ८४२ कंपन्यांचे शेअर वधारले आहेत. १६७ कंपन्यांचे शेअर स्थिर राहिले आहेत.