मुंबई - चीनमधून जगभरातील देशांमध्ये पसरलेल्या करोना विषाणुमुळे अर्थकारण ढासळत चालले आहे. भारतीय शेअर बाजारात याचे परिणाम आज दिसून आले. सलग तिसऱ्या दिवशी बाजारात मोठी पडझड झाली. मात्र, गुंतवणूकधारांनो अशा स्थितीत घाबरू नका, सबुरीने निर्णय घ्या, असा सल्ला शेअर बाजार गुंतवणूकतज्ज्ञांनी दिला आहे.
शुक्रवारी शेअर बाजार उघडताच निर्देशांकात तब्बल ३ हजार अंशांनी घसरण झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकही ९६६.१ अंकांनी घसरली. मात्र शेअर मार्केट बंद होताना निर्देशांक वधारला आहे.
काही दिवसात ही स्थिती बदलणार आहे, अशा आशावाद शेअर बाजार गुंतवणूकतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. शेअर बाजारात नव्या गुंतवणूकदारासाठी संधी आहे, असा सल्लाही शेअर बाजार तज्ज्ञांनी दिला आहे. सोन्याच्या भावात २६०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमला ४१,५५६ रुपयांवर आला आहे.
हेही वाचा-सावरला! मोठ्या पडझडीनंतर निफ्टीसह वधारला मुंबई शेअर बाजार
भारतीय अर्थव्यवस्था खूप मजबूत आहे. कोरेनामुळे तात्पुरता बाजारामध्ये फरक पडला आहे. मात्र काही दिवसात पुन्हा बाजार वधारेल, असा अंदाज गुंतवणूक तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. शेअर बाजारामध्ये चढ-उतार होत असतात. सध्या, मात्र कोरोनामुळे शेअर बाजारात मोठी पडझड होत आहे. तेव्हा नवीन गुंतवणूकदारांना मोठी संधी असते, असा गुंतवणूकदार सल्ला देतात. शेअर बाजारामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मोठी घरसण झाली होती. मात्र गुंतवणूकदारांनी सबुरीने निर्णय घ्यावा, असे गुंतवणूकदार एम. टी. चौधरी यांनी सांगितले.
हेही वाचा-बाजारातील चढ-उतारावर सेबीने 'ही' दिली प्रतिक्रिया
(बातमीमधील मत हे तज्ज्ञांचे मत आहे. या मताशी ईटीव्ही भारत सहमत असेलच असे नाही.)