ETV Bharat / business

कोरोनाने सोने खरेदीचे उडाले रंग; मागणीत 70 टक्के घसरण

जागतिक सुवर्ण परिषदेने (डब्ल्यूजीसी)ने सोन्याच्या मागणीबाबतचा अहवाल तयार केला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत एकूण 62,420 कोटी रुपयांच्या सोन्याची मागणी होती. मात्र, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 26 हजार 600 कोटी रुपयांच्या सोन्याची मागणी राहिल्याचे डब्ल्यूजीसीच्या अहवालात म्हटले आहे.

संग्रहित
संग्रहित
author img

By

Published : Jul 30, 2020, 4:26 PM IST

नवी दिल्ली – कोरोनाच्या संकटाने सर्वच व्यवसायावर परिणाम होत असताना सोन्याच्या मागणीवरही परिणाम झाला आहे. चालू वर्षात एप्रिल-जुनदरम्यान सोन्याची मागणी गतवर्षीच्या तुलनेत 63.7 टनांनी कमी झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात जाहीर केलेली टाळेबंदी आणि सोन्याचे वाढलेले दर याचा सोन्याच्या मागणीवर परिणाम झाल्याचे डब्ल्यूजीने म्हटले आहे.

जागतिक सुवर्ण परिषदेने (डब्ल्यूजीसी)ने सोन्याच्या मागणीबाबतचा अहवाल तयार केला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत एकूण 62,420 कोटी रुपयांच्या सोन्याची मागणी होती. मात्र, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 26 हजार 600 कोटी रुपयांच्या सोन्याची मागणी राहिल्याचे डब्ल्यूजीसीच्या अहवालात म्हटले आहे.

  • सोन्याच्या मुल्याच्या मागणीचा विचार करता चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत गतवर्षीच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत 57 टक्के घसरण झाली आहे.
  • मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 168.6 टन मौल्यवान दागिन्यांची मागणी होती. तर चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत दागिन्यांच्या मागणीत 74 टक्के घसरण होवून 44 टन दागिन्याची मागणी राहिली आहे.
  • गतवर्षीच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत सोन्यातील एकूण गुंतवणूक ही यंदा 56 टक्क्यांनी घसरली आहे.
  • सोन्याची गतवर्षी एप्रिल ते जुनमध्ये 247.4 टन सोन्याची आयात झाली होती. यंदा सोन्याच्या आयातीत 95 टक्के घसरण होवून 11.6 टन सोन्याची आयात धाली आहे.

डब्ल्यूसीजीचे व्यवस्थापकीय संचालक सोमसुंदरम पी. आर. म्हणाले, की सोन्याच्या मागणीच्या तुलनेत गुंतवणूक चांगली राहिली आहे. कारण सोन्याची गुंतवणूक ही सुरक्षित मानली जाते. टाळेबंदीत ऑनलाईन खरेदी हा चांगला पर्याय राहिला आहे. गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्सची मागणी वाढल्याचे दिसून आले आहे. सोन्याची किंमत प्रति तोळा 50 हजार रुपयांहून अधिक किंमत झाली आहे. अशा स्थितीत गुंतवणूकदारांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. जानेवारी 2019 पासून सोन्याची किंमत 60 टक्क्यांनी वाढली आहे. तर जानेवारी 2020 पासून सोन्याची किंमत 20 टक्क्यांनी वाढली आहे. मात्र, आर्थिक अस्थिरता असताना चालू वर्षात सोन्याचे दर किती राहू शकतील, याचा अंदाज कुणालाच करणे शक्य नसल्याचे डब्ल्यूसीजीचे व्यवस्थापकीय संचालक सोमसुंदरम यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.