मुंबई - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे भाव वाढले आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांना फायदा झाला आहे. मागणी वाढल्याने कारखान्यांनी २८ लाख टन अधिक साखरेची निर्यात केली आहे.
साखरेची निर्यात वाढल्याने देशातील साखरेचे भाव वाढले आहेत . साखर प्रति क्विंटल १०० रुपयांनी महागली आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने (एनएफसीएसएफ) चालू वर्षात ६० लाख टन साखर निर्यातीचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे म्हणाले, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेची मागणी वाढल्याने देशात दर वाढले आहेत. केंद्र सरकारने कारखान्यांमधून चालू वर्षात ६० लाख टन साखर निर्यात करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. केंद्र सरकारने २०१८ ला ५० लाख टन साखर निर्यात करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. मात्र, केवळ ३८ लाख टन साखरेचे निर्यात करण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले होते.
हेही वाचा-'पीएमसी'चे पुनरुज्जीवन; शरद पवारांनी घेतली अनुराग ठाकूर यांची भेट
चालू वर्षाचे 'साखर उत्पादन आणि विपणन वर्ष' हे १ ऑक्टोबर २०१९-२० पासून सुरू झाले. मात्र, चार महिन्यातच २८ लाख टन साखरेच्या निर्यातीचे सौदे करण्यात आले आहेत. मागणी असेपर्यंत पुरवठा सुरूच राहणार असल्याचे नाईकनवरे यांनी सांगितले.