ETV Bharat / business

केंद्र सरकार कांद्याच्या निर्यातीवरील निर्बंध हटविणार? - कांदा निर्यात बंदी

बाजारात नव्या कांद्याची आवक होत असल्याने किमती आणखी कमी होणार आहेत. त्यामुळे कांद्याच्या निर्यातीवरील बंधन काढण्याची गरज असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

onion Market
कांदा बाजारपेठ
author img

By

Published : Jan 21, 2020, 7:24 PM IST

नवी दिल्ली - केंद्र सरकार कांद्याच्या निर्यातीवरील निर्बंध हटविण्यावर विचार करत आहे. सध्या, बाजारात नव्या मालाची आवक असल्याने कांद्याची किंमत कमी होत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

बाजारात नव्या कांद्याची आवक होत असल्याने किमती आणखी कमी होणार आहेत. त्यामुळे कांद्याच्या निर्यातीवरील बंधन काढण्याची गरज असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. कांद्याच्या किमती बाजारात गुणवत्तेप्रमाणे प्रति किलो ६० ते ७० रुपयादरम्यान आहेत. गेल्या महिन्यात कांद्याच्या किमती प्रति किलो १६० रुपयापर्यंत पोहोचल्या होत्या. जानेवारी ते मे दरम्यान बाजारात नवा कांदा उपलब्ध होणार आहे.

केंद्र सरकारने कांद्याच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सप्टेंबर २०१९ मध्ये कांदा निर्यातीवर निर्बंध लागू केले होते. तसेच घाऊक व किरकोळ विक्रेत्यांच्या कांदा साठवणुकीवर मर्यादा घालून दिली होती. दिल्लीसह देशातील सर्व शहरांच्या किरकोळ बाजारपेठेत कांद्याच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या होत्या.

हेही वाचा-डेबिट कार्ड नसले तरी एटीएममधून काढता येणार पैसे, 'या' बँकेची सुविधा

महाराष्ट्र, कर्नाटक या कांदा उत्पादनात आघाडीवर असलेल्या राज्यांना पुराचा फटका बसल्याने कांद्याचे उत्पादन घटले होते. त्यामुळे कांद्याची बाजारातील आवक कमी होवून किमती वाढल्या होत्या. मागील खरीप हंगामात कांद्याचे उत्पादन सुमारे २५ टक्क्यांनी कमी झाल्याचा अंदाज आहे.

हेही वाचा-आर्थिक कसरत : केंद्र सरकार आरबीआयकडून 'एवढे' कोटी रुपये घेण्याची शक्यता

Intro:Body:

Dummy Business news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.