नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारात सतत स्थिती बदलत असताना देशात सोन्याचे दर पुन्हा वाढले आहेत. सोन्याचे दर दिल्लीत प्रति तोळा २३६ रुपयांनी वाढून ५१ हजार ५५८ रुपये आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सकारात्मक स्थिती असल्याने सोन्याचे दर वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरीजने म्हटले आहे. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ५१ हजार ३२२ रुपये होता.
चांदीचा दर दिल्लीत प्रति किलोला ३७६ रुपयांनी वाढून ६२ हजार ७७५ रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६२ हजार ३९९ रुपये होता. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल म्हणाले, की २४ कॅरेट सोन्याचा दर दिल्लीत प्रति १० ग्रॅमला २३६ रुपयांनी वाढला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर वाढून प्रति औंस १ हजार ९१० डॉलर आहे. तर चांदीचा दर प्रति औंस २४.२७ डॉलर आहे. अमेरिकत डॉलरचे मूल्य घसरल्याने सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. अमेरिकच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याबाबत चिंता व्यक्त होत असल्याने डॉलरचे मूल्य घसरल्याचे पटेल यांनी म्हटले आहे.