नवी दिल्ली - सोन्याच्या किमती ३ रुपयाने वधारून प्रति तोळा ५०,११४ रुपये आहेत. रुपयाची घसरण झाली असताना सोन्याच्या किमतीत किंचित वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ५०,१११ रुपये होता.
चांदीच्या किमती प्रति किलो ४५१ रुपयांनी वधारून ६२,०२३ रुपये आहे. मागील सत्रात चांदीची किंमत प्रति किलो ६१,५७२ रुपये होती. रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत सुमारे १२ पैशांनी घसरल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल यांनी म्हटले आहे.
जागतिक बाजारात संमिश्र स्थिती-
जागतिक बाजारात सोन्याच्या किमती वाढून प्रति औंस १,८७७ डॉलर आहेत. तर चांदीची किंमत जवळपास स्थिर राहून प्रति औंस २४.२० डॉलर आहे. अमेरिकेत आर्थिक पॅकेज जाहीर होण्याची गुंतवणूकदारांना आशा आहे. तर कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानेही गुंतवणूकदारांना चिंता आहे. अशा स्थितीत सोन्याच्या किमती स्थिर राहिल्याचे पटेल यांनी म्हटले आहे.