नवी दिल्ली - सोन्याचे दर बुधवारी दोन महिन्यात सर्वात कमी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा दर वधारले आहेत. सोन्याचे दर दिल्लीत प्रति तोळा ५२६ रुपयांनी वाढून ४६,३१० रुपये आहे. जागतिक बाजारात सोन्याचे वाढलेले दर आणि रुपयांची घसरण या कारणांनी सोन्याच्या किमती देशात उतरल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.
मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४५,७८४ रुपये होता. सोन्यापाठोपाठ चांदीचे दरही वधारले आहेत. चांदीचे दर प्रति किलो १,२३१ रुपयांनी वधारून ६८,६५४ रुपये आहेत. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६७,४२३ रुपये होता.
हेही वाचा-VIDEO: गावात शिरली मगर, रस्त्यावरुन चालतानाचा व्हिडिओ व्हायरल
या कारणाने सोन्याच्या दरात वाढ
- कोमेक्समध्ये सोन्याचे दर पुन्हा वाढले आहेत.
- दुसरीकडे रुपयाचे दर डॉलरच्या तुलनेत घसरले आहेत.
- अशा स्थितीत दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचे दर ५२६ रुपयांनी वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल यांनी सांगितले.
- रुपयाचे मूल्य गुरुवारी डॉलरच्या तुलनेत ५ पैशांनी घसरून ७४.३७ रुपये आहे.
- आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर प्रति औंस १,७७८ डॉलर आहे. तर चांदीचे दर स्थिर राहून प्रति औंस २६.२५ डॉलर आहेत.
हेही वाचा-ट्विटरविरोधात संताप; अनेक वापरकर्त्यांच्या टाईमलाईनमध्ये अडथळा
- सोमवारी असे होते सोने-चांदीचे दर
सोन्याचे दिल्लीत सोन्याचे दर प्रति तोळा ११६ रुपयांनी वाढून ४६,३३७ रुपये होते. तर त्यामागील मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४६,२२१ रुपये होता. सोन्यापाठोपाठ चांदीचे दर सोमवारी वधारले होते. चांदीचे दर प्रति किलो १६१ रुपयांनी वाढून सोमारी ६६,८५४ रुपये होते.
- मंगळवारी असे होते सोने-चांदीचे दर
सोन्याचे दर मंगळवारी दिल्लीत प्रति तोळा ९९ रुपयांनी कमी होऊन ४६,१६७ रुपये राहिले होते. चांदीचे दर प्रति किलो २२२ रुपयांनी घसरून ६७,९२६ रुपये राहिले होते.
- बुधवारी असे होते सोने-चांदीचे दर
सोन्याच्या दरात दिल्लीत प्रति तोळा २६४ रुपयांची घसरण झाली होती. या घसरणीनंतर दिल्लीत सोने प्रति तोळा ४५,७८३ रुपये होते. चांदीचे दर प्रति किलो ६० रुपयांनी घसरून ६७,४७२ रुपये होते. गेल्या दोन महिन्यांत सोन्याचा दर गुरुवारी सर्वात कमी होता. डॉलरचे मूल्य वाढत असल्याने सोन्याचे दर घसरले होते.