नवी दिल्ली - कोरोना लसीच्या वापराला जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिल्यानंतर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याचे दर प्रति तोळा (१० ग्रॅम) २० रुपयांनी वाढून ४९,६७८ रुपये आहे. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४९,६९८ रुपये होता.
सोन्यापाठोपाठ चांदीचे दरही वधारले आहेत. चांदीचा दर प्रति किलो ४०४ रुपयांनी वाढून ६७,५२० रुपये आहेत. तर मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६७,९२४ रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर अंशत: घसरले आहेत. चांदीचे दर स्थिर राहिले आहेत. आठवडाखेअर सुट्ट्या आल्याने मौल्यवान धातुंचे दर घसरल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल यांनी सांगितले.
हेही वाचा-कोरोना लसीच्या आयात-निर्यातीला केंद्र सरकारकडून परवानगी
लस बाजारात येणार असल्याने सोन्याच्या दरात घसरण-
जागतिक बाजारातील अनिश्चितता आणि कोरोनाचा वाढता संसर्ग या कारणांनी गुंतवणूकदार हे सोन्यामधील गुंतवणुकीकडे वळले होते. कोरोनाची लस बाजारात येण्याची चिन्हे असताना सोन्याच्या किमती आणखी कमी होत आहेत. जागतिक औषध कंपनी फायझर आणि बायोन्टेकने कोरोनावरील लस ही ९५ टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे. या कंपन्यांना आपत्कालीन स्थितीत लसीच्या परवानगीसाठी जागतिक आरोग्य संघटनेने परवानगी दिली आहे.
हेही वाचा-मोबाईलवरील कर कपात करण्याची आयसीईएची सरकारकडे मागणी