नवी दिल्ली - सोन्याच्या किमती प्रति तोळा 88 रुपयांनी कमी झाल्या आहेत. या घसरणीनंतर सोन्याचा दर दिल्लीत प्रति तोळा 47,005 रुपये आहे. मागणी कमी झाल्याने सोन्याचे दर कमी झाले आहेत.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये डिसेंबरमधील सौद्यासाठी सोन्याचे दर 8 रुपयांनी घसरून 47,005 रुपये आहेत. तर न्यूयॉर्कमध्ये सोन्याचा दर 0.13 टक्क्यांनी घसरून प्रति औंस 1,792 डॉलर राहिले आहेत.
हेही वाचा-दहशतवाद्यांचा ग्रेनेडने पुलावामात सुरक्षा दलावर हल्ला; चार नागरिक जखमी
दरांबाबत काय म्हणतात जळगावचे सराफ व्यावसायिक?
सोने व चांदीच्या दरांमध्ये होणारे चढउतार यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'शी बोलताना जळगाव जिल्हा सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गौतमचंद लुणिया म्हणाले होती की, चालू आठवड्यात जळगावच्या सराफ बाजारात सोने व चांदी दोन्ही धातूंच्या दरांमध्ये फारसा लक्षणीय चढउतार पाहायला मिळाला नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक व्यवहार स्थिर असल्याने सोने व चांदीचे दर 200 ते 300 रुपयांनी कमी-जास्त राहिले. सध्या लग्नसराई नाही. पावसाळा असल्याने सराफ बाजारात उलाढाल मंदावली आहे. सोने व चांदीचे दर जवळपास स्थिर असल्याने गुंतवणूकदारांनी देखील खरेदी-विक्री करण्यात हात आखडता घेतल्याचे चित्र असल्याचे लुणिया यांनी सांगितले.
हेही वाचा-मोदी सरकामध्ये दम असेल तर तालिबानींना दहशतवादी घोषित करावे-असदुद्दीन ओवैसी