नवी दिल्ली - सोन्याच्या दरात नवी दिल्लीत प्रति तोळा ६१४ रुपयांनी घसरण झाली आहे. सोन्याचा दर आज प्रति तोळा हा ५२ हजार ३१४ रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती घसरल्याने देशातही सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.
मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ५२ हजार ९२८ रुपये होता. चांदीचा दर प्रति किलो १ हजार ७९९ रुपयांनी घसरून आज ७१ हजार २०२ रुपये आहे. एचडीएफसी सिक्युरिटीडचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपान म्हटले, की आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत घसरून प्रति औंस १ हजार ९६३ डॉलर आहे. तर चांदीचा दर प्रति औंस २७.९७ डॉलर आहे.
हेही वाचा-बँका कर्जाची पुनर्रचना करण्यास मुक्त; मात्र कर्जदारांना दंड आकारता येणार नाहीत
अमेरिका आणि चीनमध्ये उत्पादन क्षेत्रात सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर गुंतवणूकदारांनी जोखीम घेत सोन्याशिवाय इतर ठिकाणी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा-बँका कर्जाची पुनर्रचना करण्यास मुक्त; मात्र कर्जदारांना दंड आकारता येणार नाहीत