नवी दिल्ली - सोन्याचे दर दिल्लीत प्रति तोळा १८८ रुपयांनी वधारले आहेत. या दरवाढीनंतर दिल्लीत सोने प्रति तोळा ४६,४६० रुपये आहे. घसरणीनंतर जागतिक बाजारात सोन्याच्या किमती सावरत असल्याने ही दरवाढ झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.
मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४६,२७२ रुपये होता. सोन्यापाठोपाठ चांदीचे दरही वधारले आहेत. चांदी प्रति किलो १७३ रुपयांनी वधारून ६७,६५८ रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६७,४८५ रुपये होता.
हेही वाचा-शेअर बाजाराचा फटका; गौतम अदानी यांचा नव्हे 'या' उद्योगपतीचा आशियात दुसरा क्रमांक
आंतरराष्ट्रीय बाजारात वधारले सोन्याचे दर-
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर वधारून प्रति औंस १,७७१ डॉलर आहे. तर चांदीचे दर किंचित वधारून प्रति डॉलर २६,३५ डॉलर आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष (कमोडिटी संशोधन) नवनीत दमानी म्हणाले, की मागील सत्रात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. त्यानंतर पुन्हा सोन्याचे दर वधारले आहेत.
हेही वाचा-दरवाढीचा वणवा! महानगरांमध्ये मुंबई, हैदराबादनंतर बंगळुरूमध्येही पेट्रोल शंभरी पार
सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्क बंधनकारक-
केंद्र सरकारनं आता सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्क बंधनकारक केले आहे. 16 जूनपासून देशात सोन्यावर हॉलमार्किंग अनिवार्य असेल. म्हणजेच ज्वेलर्स केवळ हॉलमार्क असलेलेच दागिने विकतील. हॉलमार्किंग 1 जूनपासून अनिवार्य करण्यात येणार होते. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे केंद्र सरकारने शिथिलता देत तारीख वाढवली होती. टप्प्याटप्प्याने याची अंमलबजावणी केली जाईल आणि सुरुवातीला ही योजना 256 जिल्ह्यात राबविली जात आहे, असे केंद्राकडून सांगण्यात आले आहे.