नवी दिल्ली - विदेशी गुंतवणूकदारांनी (एफपीआय) ऑक्टोबरमध्ये भांडवली बाजारात ३ हजार 800 कोटींची गुंतवणूक केली आहे. जागतिक आर्थिक मंचावरील अनुकूल स्थिती आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे केंद्र सरकारचे निर्णय यामुळे एफपीआयने गुंतवणूक करण्याला प्राधान्य दिले आहे.
सलग दुसऱ्या महिन्यात एफपीआयने भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. सप्टेंबरमध्ये एफपीआयने देशातील भांडवली बाजारात ६ हजार ५५७.८ कोटींची गुंतवणूक केली होती.
एफपीआयने जुलै आणि ऑगस्टमध्ये विदेशी भांडवली बाजारामधून मोठ्या प्रमाणात निधी काढून घेतला होता. अखेरीस केंद्र सरकारने आर्थिक सुधारणांना चालना देण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचा फायदा दिसू लागला आहे.
हेही वाचा-विक्रम संवत २०७६ वर्ष हे अधिक प्रकाशमय असेल - बाजार विश्लेषक
विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारामधील भांडवली बाजारामधील गुंतवणूक वाढविण्याला प्राधान्य दिले आहे. अमेरिका आणि चीनमधील व्यापारी वाद निवळत असल्यानेही आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांची जोखीम घेण्याची क्षमता वाढली आहे. त्यामुळेच वेगाने वाढणाऱ्या भारतासारख्या देशाच्या भांडवली बाजारामधील गुंतवणूक वाढत आहे.