नवी दिल्ली - विदेशी गुंतवणुकदारांनी सलग ५ व्या महिन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणे सुरुच ठेवले आहे. जूनमध्ये एफीआय (फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स) यांनी जूनमध्ये १० हजार ३८४ कोटींची गुंतवणूक केली आहे. सरकारकडून आर्थिक सुधारणा सुरुच राहतील, या अपेक्षेतून ही गुंतवणूक झाली आहे.
एनडीए सरकारकडून आर्थिक सुधारणा सुरुच राहितील, अशी गुंतवणुकदारांना अपेक्षा आहे. तरी त्यांनी थांबा आणि पहा, असे धोरण स्वीकारल्याचे मॉर्निंगस्टारचे वरिष्ठ संशोधक विश्लेषक हिमांशू श्रीवास्तव यांनी सांगितले. जानेवारीपासून एफपीआयने शेअरमध्ये एकूण ८७ हजार ३१३.२२ कोटींची गुंतवणूक केली आहे.