ETV Bharat / business

जाणून घ्या, मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय, लक्ष्मीपुजनादिवशी एक तास सुरू राहणार ट्रेडिंग - Laxmipujan Muhurat

यंदा संवस्तर 2078 या नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. शेअर बाजारात या दिवशी सुख आणि समृद्धी येत असल्याचे मानले जाते. कोरोनाच्या काळातही शेअर बाजाराचा निर्देशांक सातत्याने वधारला आहे.

शेअर बाजार
शेअर बाजार
author img

By

Published : Nov 3, 2021, 8:41 PM IST

Updated : Nov 4, 2021, 5:41 PM IST

हैदराबाद- दिवाळीत हिंदू वर्ष अर्थ नवीन विक्रम संवत्सराची सुरुवात होणार आहे. त्यामुळे देशभरातील व्यापारी धन आणि समृद्धीचे प्रतिक असलेल्या देवी लक्ष्मीची पुजा करून नवीन खाते सुरू करतात. त्याच पद्धतीने भारत शेअर बाजाराकडून या परंपरेचे पालन करत मुहूर्त ट्रेडिंग करण्यात येणार आहे.

गुंतवणुकदारांना एका तासासाठी विशेष व्यापारी खिडकी शेअर खरेदी व विक्री करण्यासाठी सुरू केली जाते. त्याला मुहूर्त व्यापार (ट्रेडिंग) म्हटले जाते. हा दिवस शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी वर्षाचा पहिला दिवस मानला जातो. इक्विटी, इक्विटी फ्यूचर्स आणि कमोडिटीजसाठी 4 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी 6.15 ते 7.15 दरम्यान मुहूर्त ट्रेडिंग(Muhurat Trading Session) सत्र आयोजित होणार आहे.

हेही वाचा-DIWALI 2021: महाराष्ट्रातील देश-विदेशातील महागड्या मिठाई.. 'या' 10 मिठाईंची किंमत ऐकून बसेल धक्का

यंदा संवस्तर 2078 या नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. शेअर बाजारात या दिवशी सुख आणि समृद्धी येत असल्याचे मानले जाते. कोरोनाच्या काळातही शेअर बाजाराचा निर्देशांक सातत्याने वधारला आहे.

हेही वाचा-Paytm आणणार 16,600 कोटींचा IPO, गुंतवणूकदारांसाठी यंदाच्या दिवाळीमध्ये मोठी संधी

मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय?

नवीन वर्षाची सुरुवातही दिवाळीपासून होते. भारतीय परंपरेनुसार, देशाच्या बर्‍याच भागात दिवाळीतच नवीन आर्थिक वर्षाची सुरूवात होते. या शुभ मुहूर्तावर संध्याकाळी लक्ष्मी पूजनच्या मुहूर्तावर शेअर्स आणि कमोडिटी बाजार खुले राहणार आहेत. मुहूर्त ट्रेडिंग (Live Trading Session Time) एका तासासाठी खुले राहणार आहे. दरवर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर ट्रेडिंगसाठी विशेष सत्र आयोजित केले जाते. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आर्थिक भरभराटीसाठी ही पूजा करून शेअर बाजारातील व्यवहार सुरू ठेवले जातात.

हेही वाचा-दिपोत्सवात यंदा सोन्याची मागणी सुमारे 25 टक्क्यांनी वाढणार- सराफ व्यवसायिकांना अपेक्षा

Last Updated : Nov 4, 2021, 5:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.