ETV Bharat / business

लक्ष्मी पुजनानिमित्त आज शेअर बाजारात विशेष ट्रेडिंग, जाणून घ्या माहिती - Muhurat trading latest news

दिवाळीच्या निमित्ताने शेअर मार्केट बीएसई आणि एनएसई लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर संध्याकाळी 6 वाजून 15 मिनिटानी एक तासाच विशेष ट्रेडिंग करण्यात येणार आहे. दोन्ही एक्सचेंजनुसार दिवाळीच्या दिवशी मुहूर्ताचा व्यापार 6.15 ते संध्याकाळी 7.15 पर्यंत असेल.

संग्रहित
संग्रहित
author img

By

Published : Nov 14, 2020, 12:07 PM IST

मुंबई- भारतीय शेअर बाजारासाठी दिवाळीतील लक्ष्मीपुजनाचा दिवस खास आहे. शेअर बाजारात आज गुंतवणूक एक तासासाठी खुली असते. या दिवशी ट्रेड्रिंग केल्याने वर्ष चांगले जाते, अशी गुंतवणूकदारांची धारणा असते.

देशभरातील गुंतवणूकदार आणि बाजारपेठेतील दिग्गज कंपनी एका विशिष्ट वेळी बाजारात पैसे गुंतवतात. या विशिष्ट वेळी कोणालाही नफ्याची चिंता नाही. कोणीही त्यांचे पैसे काढण्याचा प्रयत्न करीत नाही. फक्त एक परंपरा ठेवून मग ते बाजारात गुंतवितात. दररोज हजारो कोटी रुपयांचा व्यापार करणाऱ्या शेअर बाजाराने बर्‍याच वर्षांपासून आपल्या परंपरा कायम ठेवल्या आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा म्हणजे दिवाळीच्या दिवशीचा मुहूर्त व्यापार आहे. शेअर बाजार सुट्टीचा दिवस असला तरी मुहूर्त व्यापारासाठी बाजारात फक्त 1 तासासाठी व्यवहार होतात. एका तासामध्ये गुंतवणूकदार आपली छोटी गुंतवणूक करतात आणि बाजारपेठेतील परंपरा पाळतात.

कोणता आहे शुभ मुहूर्त?

दिवाळीच्या निमित्ताने शेअर मार्केट बीएसई आणि एनएसई लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर संध्याकाळी 6 वाजून 15 मिनिटानी एक तासाच विशेष ट्रेडिंग करण्यात येणार आहे. दोन्ही एक्सचेंजनुसार दिवाळीच्या दिवशी मुहूर्ताचा व्यापार 6.15 ते संध्याकाळी 7.15 पर्यंत असेल. पूर्व उद्घाटन सत्र संध्याकाळी 6 ते संध्याकाळी 6: 14 दरम्यान असणार आहे.

  • मुहूर्त ट्रेडिंग सेशन : सायंकाळी 6:15 ते 7:15
  • ब्लॉक डिल सेशन : सायंकाळी 5.45 ते 6
  • कॉल ऑक्शन - सायंकाळी 6:20 ते 7:05
  • पोस्ट क्लोझिंग मुहूर्त सेशन : 7:25 ते 7:35

मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय?

नवीन वर्षाची सुरुवातही दिवाळीपासून होते. भारतीय परंपरेनुसार, देशाच्या बर्‍याच भागात दिवाळीतच नवीन आर्थिक वर्षाची सुरूवात होते. या शुभ मुहूर्तावर शेअर बाजारातील व्यापारी विशेष स्टॉक ट्रेडिंग करतात. म्हणून त्याला मुहूर्त ट्रेडिंग म्हटले जाते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.