नवी दिल्ली - किरकोळ बाजारपेठेत महागाईने डिसेंबरमध्ये उच्चांक नोंदविला आहे. डिसेंबरमध्ये किरकोळ बाजारातील महागाईची ७.३५ टक्क्यांची नोंद झाली आहे. तर नोव्हेंबरमध्ये किरकोळ बाजारातील महागाईची ५.५४ टक्के नोंद झाली होती.
डिसेंबरमध्ये ग्राहक किंमत निर्देशांकाची (सीपीआय) गतवर्षीच्या डिसेंबरच्या तुलनेत अधिक नोंद झाली आहे. गतवर्षी डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई २.११ टक्के राहिली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार डिसेंबरमध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई १४.१२ टक्के राहिली आहे. तर नोव्हेंबरमध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई १०.०१ टक्के राहिली आहे. गतवर्षी डिसेंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई ही उणे २.६५ टक्के राहिली होती.
हेही वाचा-'ओयो'कडून 1200 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर 'संक्रांत'
अन्नाच्या महागाईने डिसेंबरमध्ये उच्चांक केला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण जाहीर करताना किरकोळ बाजारपेठेतील महागाईचा विचार करण्यात येतो. मागील पतधोरणात आरबीआयने रेपो दर जैसे थे ठेवले होते. आरबीआय पुढील पतधोरण ६ फेब्रुवारीला जाहीर करणार आहे. केंद्र सरकारने किरकोळ बाजारातील किमान २ टक्के तर कमाल ४ टक्के महागाई निश्चित केली आहे. मात्र, या महागाईने मर्यादा ओलांडली आहे.