नवी दिल्ली - महामारीच्या काळात किंचितशी दिलासादायक बातमी आहे. सरकारी आकडेवारीनुसार मार्चच्या तुलनेत किरकोळ बाजारपेठेतील महागाईचे प्रमाण एप्रिलमध्ये कमी झाले आहे.
केंद्रीय सांख्यिकी आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या आकडेवारीनुसार एप्रिलमध्ये अन्नाच्या वर्गवारीत महागाईचे प्रमाण एप्रिलमध्ये २.२ टक्के राहिले आहे. तर त्यापूर्वी मार्चमध्ये अन्नाच्या वर्गवारीत महागाईचे प्रमाण ४.८७ टक्के होते. एप्रिलमध्ये किरकोळ बाजापेठेतील महागाईचे प्रमाण ४.२९ टक्के होते. तर मार्चमध्ये किरकोळ बाजारपेठेतील महागाईचे प्रमाण ५.५२ टक्के होते.
हेही वाचा-ऐन महामारीत खाद्यतेलासह एलपीजीच्या महागाईचा 'भडका'; दोन वर्षात किमती दुप्पट
स्थानिक भागात निर्बंध असूनही किमतीवर मर्यादित परिणाम-
इक्राचे मुख्य अर्थतज्ज्ञ आदिती नायर म्हणाल्या, की एप्रिल २०२० मध्ये देशभरात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर पुरवठा साखळी विस्कळित झाली होती. एप्रिल २०२१ मध्ये मागील तीन महिन्यांच्या तुलनेत महागाईचे प्रमाण कमी झाले आहे. तर स्थानिक भागात निर्बंध असूनही एप्रिल २०२१ मध्ये किमतीवर मर्यादित परिणाम झाल्याचे नायर यांनी म्हटले आहे.
भारतीय रिझर्व्ह बँक पतधोरण निश्चित करताना ग्राहक किंमत निर्देशांकावर (सीपीआय) आधारित असलेल्या किरकोळ बाजारपेठेमधील महागाईचा विचार करते.
हेही वाचा-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाटा मोटर्सपाठोपाठ मारुती व टोयोटोकडून वॉरंटीत वाढ