मुंबई - मुंबई शेअर बाजाराने अर्थसंकल्पाच्या दिवशी म्हणजे आज शेअर बाजार खुला ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. साधारणतः बाजार आठवड्यातून दोन दिवस म्हणजे शनिवारी आणि रविवारी शेअर बाजार बंद असतो. मात्र अपवादात्मक किंवा विशेष कारण असल्यास बाजार शनिवारी आणि रविवारीही बाजार उघडले जाऊ शकतात. अर्थसंकल्प सादर केला जात असल्याने शेअर बाजार खुला आहे.
अर्थसंकल्पाच्या दिवशी बाजारातील घडामोडींकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले असते. मोदी सरकारने आजपर्यंत मांडलेल्या सहा अर्थसंकल्पांपैकी चार पूर्ण अर्थसंकल्पांच्या दिवशी शेअर बाजारात घसरण नोंदविण्यात आली होती. त्यामुळे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचा अंदाज यावा, यासाठी बाजार खुला आहे. शेअर बाजार आज नेहमीच्याच वेळेला खुला आहे. बाजारात सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी साडेतीन वाजेपर्यंत नेहमीप्रमाणेच व्यवहार पार पडणार आहेत.
हेही वाचा-केंद्रीय अर्थसंकल्प होणार सादर...खिसा कापणार की भरणार?
अर्थसंकल्पात होणाऱ्या घोषणांचा शेअर बाजारावर काही परिणाम होतो का, हे पाहण्यासाठी बाजाराशी संबंधितांनी चालू ठेवण्याची विनंती केली होती. या विनंतीचा विचार करता शनिवारी म्हणजे अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजार खुला ठेवण्यात आलेला आहे. यापूर्वी तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २८ फेब्रुवारील २०१५ ला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला होता. या दिवशीही शनिवार असताना मुंबई शेअर बाजार सुरू राहिला होता.
हेही वाचा-५ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था होण्यासाठी 'या' पाच आर्थिक सुधारणांची गरज
मुंबई शेअर बाजाराला केंद्रीय अर्थसंकल्पाकडून खूप आहेत अपेक्षा-
विविध क्षेत्रांसह मुंबई शेअर बाजाराला केंद्रीय अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा आहेत. चालू वर्षाच्या जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा विकासदर (जीडीपी) हा ४.५ टक्के राहिला आहे. हे जीडीपीचे प्रमाण २०१३ नंतर सर्वात कमी राहिले आहे. चालू आर्थिक वर्षात विकासदर हा ५ टक्के राहिल, असा केंद्र सरकारने अंदाज व्यक्त केला आहे. हा गेल्या ११ वर्षातील सर्वात कमी विकासदर असणार आहे.
हेही वाचा-केंद्रीय अर्थमंत्री अर्थव्यवस्थेच्या आव्हानांवर मात करणार?