ETV Bharat / business

सलग सहाव्या सत्रात मुंबई शेअर बाजारात पडझड

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ५८८.५९ अंशाने घसरून ४६,२८५.७७ वर स्थिरावला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सहा सत्रात ३,५०६.३५ अंशाने घसरला आहे.

मुंबई शेअर बाजार
मुंबई शेअर बाजार
author img

By

Published : Jan 29, 2021, 4:58 PM IST

मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक सलग सहाव्या सत्रात घसरला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ५८८ अंशाने तर निफ्टीचा निर्देशांक १८३ अंशाने घसरला आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ५८८.५९ अंशाने घसरून ४६,२८५.७७ वर स्थिरावला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सहा सत्रात ३,५०६.३५ अंशाने घसरला आहे. निफ्टीचा निर्देशांक दिवसाखेर १८२.९५ अंशाने घसरून १३,६३४.६० वर स्थिरावला. निफ्टीचा निर्देशांक सहा सत्रात १,०१०.१० अंशाने घसरला.

हेही वाचा-केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून संसदेत २०२०-२१ आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर

मुंबई शेअर बाजारासह निफ्टीच्या निर्देशांक आज अत्यंत अस्थिर राहिला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत केंद्रीय आर्थिक सर्वेक्षण अहवाल २०२०-२१ सादर केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर

डॉ. रेड्डीज, मारुती, भारती एअरटेल, बजाज ऑटो, इन्फोसिस, टीसीएस आणि बजाज फिन्सर्व्हचे शेअर घसरले. दुसरीकडे इंडसइंड बँक, सन फार्मा, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँकेचे शेअर वधारले आहेत.

हेही वाचा-चालू आर्थिक वर्षात देशाच्या जीडीपीत ७.७ टक्के घसरण होईल-आर्थिक सर्वेक्षण अहवाल

केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार गुंतवणुकदारांनी शेअर विक्रीतून नफा कमविण्याला प्राधान्य दिल्याचे बाजार विश्लेषकांनी म्हटले आहे. त्यामुळे शेअर बाजाराच्या निर्देशांकात घसरण झाल्याचे विश्लेषकांनी म्हटले आहे.

अशी आहे बाजारातील स्थिती-

विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी (एफपीआय) गुरुवारी ३,७१२.५१ कोटी रुपयांचे शेअर गुरुवारी विकले आहेत. जागतिक कच्च्या किमतीच्या निर्देशांक असलेल्या ब्रेन्ट क्रूड फ्युचरमध्ये कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ०.६६ टक्क्यांनी वाढून ५५.४२ डॉलर झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.