जळगाव - लग्नसराईमुळे मागणी वाढत असल्याने सोन्याच्या भावाने आजपर्यंतचा नवा उच्चांक गाठला आहे. सोन्याचे भाव शुक्रवारी प्रथमच ४२ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहेत. तर चांदीही ४८ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. कोरोनामुळे जागतिक बाजारातील अस्थिरता व डॉलरच्या तुलनेत घसरणारा रुपया या कारणांनी सोन्याचे भाव वाढत आहेत.
गेल्या आठवड्यात प्रति तोळा ४० हजार ५०० रुपयांवर असलेल्या सोन्याचे भाव वाढतच गेले आहेत. रुपयाच्या तुलनेत डॉलर वधारून गुरुवारी ७१.६७ रुपयांवर डॉलर पोहोचला. त्यानंतर सोन्याच्या भावानेही नवीन उच्चांक गाठला आहे. गेल्या आठवड्यापासूनचे ११ फेब्रुवारी रोजी ४० हजार ५०० रुपयांवर असलेल्या सोन्याचा भाव एकाच दिवसात ४०० रुपयांनी वाढला आहे. ही भाववाढ पुढेही सुरूच राहिली आहे. बुधवार, १९ फेब्रुवारी रोजी सोने ४१ हजार ७५० रुपयांवर पोहोचले. गुरुवारी २० फेब्रुवारी पुन्हा २५० रुपयांनी वाढ झाली आहे. आज सोने ४२ हजार ८०० रुपयांच्या नव्या उच्चांकावर जावून पोहोचले.
चांदी ५०० रुपयांनी महाग
सोन्यासोबतच चांदीच्याही भावात २० फेब्रुवारीला एकाच दिवसात प्रति किलो ५०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी प्रति किलो ४८ हजार रुपये झाले. यापूर्वी ७ जानेवारी रोजी चांदीचा भाव ४९ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचला होता. त्यानंतर मात्र हे भाव कमी होत गेले. आता चांदीत पुन्हा तेजी येऊ लागली आहे.
सोन्याचा भाव आणखी वाढण्याची शक्यता-
सुवर्ण पेढीचे जनसंपर्क अधिकारी मनोहर पाटील म्हणाले, गेल्या काही पाच-सहा दिवसात सोन्याचे भाव वाढत आहे. जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता, कोरोनाचा चीनवर झालेला आर्थिक परिणाम, लग्नसराईची मागणी, रुपयाची घसरण या कारणांनी सोन्याचे दर वाढत आहेत. एकाच कारणाने सोन्याचे दर वाढत नसल्याचे दिसत आहे. येत्या काळात सोन्याचे दर आणखी वाढतील, असा त्यांनी अंदाज व्यक्त केला.
हेही वाचा-कोरोनाचा परिणाम : टिव्हीच्या किमती मार्चपासून १० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता
सोन्याशिवाय सण अथवा लग्न नाही-
ग्राहक सुरेंद्र जाधव म्हणाले, सोन्याशिवाय लग्न अथवा साखरपुडा करण्याची आपल्याकडे पद्धत नाही. त्यामुळे सोन्याशिवाय लग्न होत नाहीत. सोन्याचे दर वाढले तर लोक सोने घेणार नाहीत, असे होत नाही. फक्त सोने घेण्याचे प्रमाण कमी होईल.
हेही वाचा-'गुगल पे'सारख्या अॅपवरून होणाऱ्या आर्थिक व्यवहारावरील शुल्क माफन्याशिवाय लग्न आणि सण नाही.