मुंबई - पुण्यात मुख्यालय असलेल्या बजाज ऑटोने डिसेंबरच्या तिमाहीत चांगली आर्थिक कामगिरी केली आहे. प्रॉफिट आफ्टर टॅक्स (पीएटी) म्हणजे सर्व कर जमा केल्यानंतर केलेल्या नफ्यामध्ये बजाजला डिसेंबरच्या तिमाहीत २३ टक्के अधिक नफा झाला आहे. डिसेंबरच्या तिमाहीत बजाज ऑटोला १,५५६ कोटी रुपये नफा झाला आहे.
बजाज कंपनीला मागील आर्थिक वर्षात डिसेंबरच्या तिमाहीत १,२६२ कोटी रुपयांचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स मिळाला होता. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० च्या तिमाहीत वाहनांची विक्री १७ टक्क्यांनी वाढली आहे. हा विक्री ८,९१० कोटी रुपयांची झाली. गतवर्षी ७,६४० कोटी रुपयांच्या वाहनांची विक्री झाली होती.
हेही वाचा-सोने प्रति तोळा ५७५ रुपयांनी महाग
असे राहिले वाहन विक्रीचे प्रमाण-
- डिसेंबरच्या तिमाहीत वाहनांच्या विक्रीत ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशांतर्ग दुचाकी वाहनांच्या विक्रीत ८ टक्के वाढ झाली आहे.
- चालू आर्थिक वर्षात ५,८५,४६९ दुचाकींची विक्री झाली आहे. मागील आर्थिक वर्षात ५,४२,९७८ दुचाकींची विक्री झाली होती. मात्र, व्यवसायिक वाहनांच्या विक्रीत ६५ टक्के घसरण झाली आहे.
- सर्वच वाहनांच्या श्रेणीत देशात बजाजच्या वाहनांची विक्री ३ टक्क्यांनी घसरली आहे.
- आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये पहिल्यांदाच कंपनीला प्रॉफिट आफ्टर टॅक्समध्ये २ हजार कोटी रुपयांहून अधिक नफा मिळाल्याचे बजाज ऑटोने म्हटले आहे.
- कंपनीने ६,८७,००० वाहनांची निर्यात केली. कंटनेरचा तुटवडा असताना निर्यातीचा आजपर्यंतचा नवा उच्चांक गाठला आहे.
- डिसेंबरच्या तिमाहीत बजाजच्या दुचाकींचा बाजारपेठेत १८.६ टक्के हिस्सा राहिल्याचे कंपनीने म्हटले आहे.
हेही वाचा-इफ्को आर्थिक उलाढालीत सहकारी संस्थांमध्ये जगात अव्वल
दरम्या, गतवर्षी आर्थिक मंदीचे चित्र आणि यंदा कोरोना महामारीमुळे वाहन क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे.