ETV Bharat / business

टाळेबंदीत अक्षय तृतीया: ऑनलाईन विक्रीतूनच सराफ साधणार 'मुहूर्त'

अक्षय तृतीयेला सोने खरेदी ही समृद्धीचे प्रतिक मानले जाते. अनेक ग्राहक सोन्याच्या खरेदीसाठी विचारणा करत आहेत. त्यामुळे काही सराफांनी ऑनलाईन पद्धत सुरू केल्याचे जैन यांनी ई टीव्ही भारतला सांगितले.

सोने
सोने
author img

By

Published : Apr 25, 2020, 7:03 PM IST

Updated : Apr 25, 2020, 9:33 PM IST

मुंबई - ऐन लग्नसराईत कोरोनामुळे टाळेबंदी असल्याने सराफांचे मोठे नुकसान झाले आहे. असे नुकसान टाळण्यासाठी सराफांनी साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहुर्त मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेला (२६ एप्रिल) ऑनलाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.

अक्षय तृतीयेला मोठ्या प्रमाणात सोने खरेदी होते. मात्र, टाळेबंदीने होणारे नुकसान टाळण्याकरता व्यापाऱ्यांनी ऑनलाईन विक्रीची शक्कल लढवल्याचे सोने-चांदीच्या व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष कुमार जैन यांनी सांगितले. अक्षय तृतीयेला सोने खरेदी ही समृद्धीचे प्रतिक मानले जाते. अनेक ग्राहक सोन्याच्या खरेदीसाठी विचारणा करत आहेत. त्यामुळे काही सराफांनी ऑनलाईन पद्धत सुरू केल्याचे जैन यांनी ई टीव्ही भारतला सांगितले.

ऑनलाईन विक्रीतूनच सराफ साधणार 'मुहूर्त'

अक्षय तृतीयेला सोन्याचे दागिने खरेदी करण्याची महिलांची पसंती असते. यंदा मात्र, अक्षय तृतीयेला सोन्याच्या नाण्यांना अधिक पसंती दिली जाईल असा विश्वास जैन यांनी व्यक्त केला. मोठ्या प्रमाणात सोने खरेदी होणार नसली तरी १० ते १२ टक्के सोने खरेदी होईल, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा-चिनी मालावर बहिष्कार; स्वदेशी जागरण मंच सुरू करणार मोहीम

ऑनलाईन खरेदी करताना ग्राहकांना किती ग्राम सोने घ्यायचे याची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर सराफांकडून ऑनलाईनच रक्कम घेतली जाणार आहे. जेव्हा टाळेबंदी संपेल तेव्हा ग्राहकांना त्यांचे दागिने अथवा नाणी दिली जाणार आहेत. टाळेबंदीमुळे लग्नसराई होत नाही. तसेच कोणत्याही मोठ्या कौटुंबिक कार्यक्रमांचे आयोजन होत नाही. त्यामुळे सोने खरेदी मंदावली आहे. मात्र, टाळेबंदी संपल्यानंतर सराफा बाजार पुन्हा तेजीत येईल, असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा-कोरोनाशी लढा: देशात रोज 'इतक्या' पीपीई कीटची होतेय निर्मिती

Last Updated : Apr 25, 2020, 9:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.