ETV Bharat / business

घाऊक बाजारपेठेतील महागाईत घसरण; फेब्रुवारीत २.२६ टक्क्यांची नोंद - घाऊक बाजारपेठ निर्देशांक

चालू वर्षात घाऊक बाजारपेठेतील महागाई जानेवारीमध्ये ३.१ टक्के होती. तर गतवर्षी जानेवारीमध्ये घाऊक बाजारपेठेतील महागाई ही २.९३ टक्के होती. ही माहिती केंद्रीय ग्रामीण आणि उद्योग मंत्रालयाने दिली आहे.

Wholesale inflation
घाऊक किंमत निर्देशांक
author img

By

Published : Mar 16, 2020, 3:45 PM IST

नवी दिल्ली - घाऊक किंमत निर्देशांकातील (डब्ल्यूपीआय) महागाईची फेब्रुवारीमध्ये २.२६ टक्के नोंद झाली आहे. अन्नधान्य आणि पालेभाज्यांचे दर घसरल्याने घाऊक बाजारातील महागाई कमी झाल्याचे सरकारी आकडेवारीमधून समोर आले आहे.

चालू वर्षात घाऊक बाजारपेठेतील महागाई जानेवारीमध्ये ३.१ टक्के होती. तर गतवर्षी जानेवारीमध्ये घाऊक बाजारपेठेतील महागाई ही २.९३ टक्के होती. ही माहिती केंद्रीय ग्रामीण आणि उद्योग मंत्रालयाने दिली आहे. अन्नधान्याच्या वर्गवारीतील घाऊक किंमत निर्देशांक गतवर्षी फेब्रुवारीमध्ये ११.५१ टक्के होता. हे प्रमाण कमी होवून चालू वर्षात फेब्रुवारीत ७.७९ टक्के झाले आहे.

हेही वाचा-'येस बँक' प्रकरणी अनिल अंबानींना 'ईडी'कडून समन्स!

जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीत कांद्याचे दर १६२.३० टक्क्यांनी कमी तर बटाट्याचे दर ६०.७३ टक्क्यांनी कमी झाले आहेत. चालू आर्थिक वर्षात महागाईचा दर १.९२ टक्के नोंदविण्यात आला आहे. तर मागील आर्थिक वर्षात महागाईचा दर हा २.७५ टक्के नोंदविण्यात आला आहे.

हेही वाचा-कोरोनातून अर्थव्यवस्थेला सावरण्याकरता रेपो दरात कपात होण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.