नागपूर - अर्थव्यवस्था मंदावली असताना ही कठीण परिस्थिती निघून जाईन, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ते विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या ६५ व्या स्थापनादिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. उद्योगांनी हारू मानू नका, असेही ते यावेळी म्हणाले.
उद्योग कठिण परिस्थितीमधून जात असल्याचे आपल्याला माहित असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, आम्हाला विकासदर वाढविण्याची इच्छा आहे. वाहन उद्योगामधील सर्व वाहन उत्पादकांची भेट घेतली आहे. ते सर्व काहीसे चिंतेत आहेत. 'कभी खुशी कभी गम होता है', असे मी त्यांना सांगितले. काही वेळा तुम्ही अपयशी होता. तर काही वेळा जिंकता...आयुष्य हे चक्र आहे. जागतिक अर्थव्यवस्थेमुळे मागणी, पुरवठा आणि उद्योगाच्या चक्रात (बिझनेस सायकल) किंचित तुम्हाला अडचणींना तोंड द्यावे लागत असेल.
हेही वाचा-'या' मुद्द्यावरून सरकार-फेसबुकमध्ये पडली वादाची ठिणगी
एवढेच नाही तर ही (मंदावलेली अर्थव्यवस्था) सर्व जगाला समस्या आहे. त्यामुळे निराश होवू नका, हा काळ निघून जाईन, असेही ते म्हणाले. येत्या काही दिवसात निश्चित आपण सर्वात वेगाने होणारी अर्थव्यवस्था होणार आहोत, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
हेही वाचा-सरकार झुकले..! कांदा आयात करण्याच्या नव्या निविदेत पाकिस्तानला कोलदांडा