ETV Bharat / business

पीएमसी बँकेत गुंतवणुकीसाठी मिळाले तीन प्रस्ताव-आरबीआय गव्हर्नर - PMC Bank resolution

बँकेला मिळालेल्या ऑफरे मुल्यांकन करण्यात असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हे मुल्यांकन झाल्यानंतर पीएमसी आरबीआयशी संपर्क साधणार असल्याचे दास यांनी सांगितले.

पीएमसी बँक
पीएमसी बँक
author img

By

Published : Feb 5, 2021, 6:52 PM IST

मुंबई - पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेत तीन गुंतवणुकदारांनी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. ही माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

पीएमसी बँकेला मिळालेल्या ऑफरचे मुल्यांकन करण्यात असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हे मुल्यांकन झाल्यानंतर पीएमसी आरबीआयशी संपर्क साधणार असल्याचे दास यांनी सांगितले. पीएमसीचे प्रशासक ए. के. दिक्षीत यांनी तीन गुंतवणुकदारांनी १ फेब्रुवारी २०२१ पर्यंत वेळा दिला असल्याचे मागील महिन्यात सांगितले होते. गुंतवणुकदारांनी बँकेची स्थिती माहित असणे आवश्यक आहे. गुंतवणुकदारांची ऑफर स्वीकारण्यापूर्वी काळजी घेत असल्याचेही दिक्षीत यांनी म्हटले होते.

हेही वाचा-सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण; चांदी महाग

दरम्यान, आरबीआयने पीएमसी बँकेवर सप्टेंबर २०१९ मध्ये निर्बंध लागू केले होते. कारण, एचडीआयएलने पीएमसी बँकेची साडेसहा हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले होते. सुरुवातीच्या टप्प्यात आरबीआयने ठेवीदारांना खात्यातून पैसे काढण्यावर मर्यादा लागू केली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ही मर्यादा वाढविण्यात आली आहे.

हेही वाचा-आरबीआयच्या पतधोरणानंतर शेअर बाजारासह निफ्टीने नोंदविला नवा विक्रम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.