नवी दिल्ली - खासदार सुप्रिया सुळे यांनी देशाची अर्थव्यवस्था व बेरोजगारीबाबत लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला. अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते अभिजित बॅनर्जी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यांच्या सूचना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वीकाराव्यात, अशी अपेक्षा सुप्रिया सुळेंनी यांनी व्यक्त केली.
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी नोबेल पारितोषिक विजेत्यांची अर्थव्यवस्थेवरील सूचना स्वीकारल्या तर आम्ही पाठिंबा देऊ, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बेरोजगारी व अर्थव्यवस्थेबाबत समिती स्थापन केली होती. या समितीच्या आकडेवारीप्रमाणे काय स्थिती आहे, असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला. रोजगार व अर्थव्यस्थेबाबत देशात निराशाजनक स्थिती असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा-केंद्रीय मंत्रिमंडळाकडून वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयकाला मंजुरी
काय म्हणाले होते अभिजीत बॅनर्जी?
अभिजीत बॅनर्जी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेसंबंधी चिंता व्यक्त केली होते. भारतीय अर्थव्यवस्था डगमगली आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार अर्थव्यवस्था लवकरच रुळावर येईल, असे वाटत नसल्याचे मत बॅनर्जी यांनी व्यक्त केले होते.
दरम्यान, चालू वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा विकासदर (जीडीपी) ४.५ टक्के राहिला आहे. हा गेल्या सहा वर्षातील सर्वात कमी जीडीपी राहिला आहे.