मुंबई - सध्याची मंदावलेली अर्थव्यवस्था ही तात्पुरती आहे. बाह्य अस्थिरतेने हा परिणाम झाला आहे. येणारी दहा वर्षे सकारात्मक राहण्यासाठी देशाकडे कारणे आहेत, असे मत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी व्यक्त केले. ते एका माध्यमाच्या कार्यक्रमात बोलत होते.
मुकेश अंबानी यांनी येणारे दशक हे व्यवसाय प्रगतीसाठी ऐतिहासिक संधी असल्याचे म्हटले आहे. भारताचे स्थान जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थेत असणार असल्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केला. सध्या, आपल्याला तात्पुरत्या वेदना दिसत आहेत. केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या नेतृत्वाने आपण त्यामधून बाहेर पडत आहोत.
हेही वाचा-प्रमुख आठ क्षेत्रांच्या वृद्धीदरात सुधारणा; जानेवारीत २ टक्क्यांची नोंद
दहा वर्षापूर्वी वस्त्रोउद्योगातील रिलायन्स ही पेट्रोकेमिकल कंपनी झाली आहे. तेलशुद्धीकरण आणि उर्जामध्ये उद्योग सुरू केले आहेत. जागतिक दर्जाचे किरकोळ आणि ग्राहककेंद्रित तंत्रज्ञान उद्योग सुरू केल्याचे अंबानी यांनी सांगितले. तरुण नेतृत्वामुळे हे मोठे परिवर्तन झाल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, जगातील सर्वात श्रीमंताच्या यादीत नवव्या क्रमांकावर मुकेश अंबानी यांचे नाव झळकले आहे.
हेही वाचा-अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष करून सरकारचे सामाजिक आणि राजकीय मोहिमेकडे लक्ष केंद्रित'