मुंबई - डॉलरच्या तुलनेत रुपया ३१ पैशांनी घसरून ७१.२८ वर पोहोचला. मूडीजने संस्थेने देशाचे पतमानांकन कमी केल्याने हा परिणाम झाला आहे.
रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत १६ ऑक्टोबरपासून सर्वात अधिक घसरले आहे. तर रुपया हा आठडाभरात डॉलरच्या तुलनेत ४७ पैशांनी घसरला. डॉलरचे मूल्य वाढल्याने रुपयावरील दबाव वाढला आहे. मूडीजने देशाचे पतमानांकन कमी केल्यानंतर भारतीय रुपयाची आशियामधील बहुतेक बाजारात घसरण झाली आहे. अशी माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजचे प्रमुख व्ही. के. शर्मा यांनी दिली.
हेही वाचा-स्वेच्छा निवृत्तीकरिता बीएसएनएल कर्मचाऱ्यांचे चारच दिवसात ५० हजार अर्ज
असा आहे मूडीजचा अंदाज-
मूडीजने देशाचे पतमानांकन हे स्थिरऐवजी नकारात्मक असे दिले आहे. वाढलेल्या आर्थिक जोखमीमुळे देशाचा विकासदर मागील विकासदराहून अंशत: कमी राहिल, असा अंदाज मूडीजने व्यक्त केला आहे.
हेही वाचा-एनईएफटीचे ऑनलाईन व्यवहार जानेवारीपासून होणार विनाशुल्क; आरबीआयची बँकांना सूचना
दरम्यान, जागतिक कच्च्या तेलाचा बाजारपेठेत प्रति बॅरलची किंमत ही १.९१ टक्क्यांनी घसरून ६१.९९ डॉलर झाली आहे.