मुंबई - रुपयाची डॉलरच्या तुलनेत आजही घसरण सुरुच राहिली आहे. या घसरणीनंतर रुपयाचे मूल्य हे एका डॉलरच्या तुलनेत ७६ रुपये ८२ पैसे झाले आहे. हे रुपयाचे आजपर्यंतचे सर्वाधिक अवमूल्यन आहे.
कोरोना महामारीमुळे जागतिक तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. या परिस्थितीमुळे रुपयाची डॉलरच्या तुलनेत घसरण होत आहे.
हेही वाचा-'व्यापाऱ्यांनी ई-कॉमर्स कंपन्यांबरोबर केवळ जीवनावश्यक वस्तुंचा व्यवहार करावा'
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर ३ टक्क्यांनी घसरेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. तर टाळाबंदी वाढविल्याने भारताचा विकासदर हा २०२० मध्ये वाढणार नसल्याचे बार्कलेजने अहवालात म्हटले आहे.
हेही वाचा-शेअर बाजार खुला होताना ३५० अंशांची घसरण, 'या' कंपन्यांचे घसरले शेअर
दरम्यान, मुंबई शेअर बाजार खुला होताना निर्देशांकात ३५० अंशांनी घसरण झाली होती.