ETV Bharat / business

किरकोळ बाजारपेठेत महागाईचा भडका, गेल्या १० महिन्यातील सर्वोच्च निर्देशांकाची नोंद - राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय

पालेभाज्या, मासे, डाळी, मांस व मासे यांचे  दर वाढल्याने ही महागाई वाढली आहे. महागाईचा निर्देशांक जूलै २०१८ मध्ये ३.१५ टक्के तर ऑगस्टमध्ये ३.६९ टक्के नोंदविण्यात आला होता. तर ऑक्टोबरमध्ये महागाईचा निर्देशांक ऑक्टोबरमध्ये ३.३८ टक्के नोंदविण्यात आला.  ही आकडेवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्ध केली आहे

संग्रहित - किरकोळ बाजारपेठ
author img

By

Published : Sep 13, 2019, 12:33 PM IST

नवी दिल्ली - अर्थव्यवस्थेची घसरण होत असताना वाढत्या महागाईचा चटकाही आता सर्वसामान्यांना बसू लागला आहे. किरकोळ बाजारपेठेत महागाईने गेल्या १० महिन्यातील सर्वोच्च निर्देशांक गाठला आहे. ऑगस्टमध्ये महागाईचा निर्देशांक हा ३.२१ टक्के नोंदविण्यात आला आहे.

पालेभाज्या, मासे, डाळी, मांस व मासे यांचे दर वाढल्याने ही महागाई वाढली आहे. महागाईचा निर्देशांक जूलै २०१८ मध्ये ३.१५ टक्के तर ऑगस्टमध्ये ३.६९ टक्के नोंदविण्यात आला होता. तर ऑक्टोबरमध्ये महागाईचा निर्देशांक ऑक्टोबरमध्ये ३.३८ टक्के नोंदविण्यात आला. ही आकडेवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्ध केली आहे.

हेही वाचा-टाटा मोटर्सला विदेशातील व्यवसायातही फटका, वाहन विक्रीत ऑगस्टमध्ये ३२ टक्क्यांची घट

आरोग्याच्या महागाईचा निर्देशांक हा ७.८४ टक्के तर वैयक्तिक निगा आणि परिणाम (इफेक्ट) यांचा निर्देशांक हा ६.३८ टक्के नोंदविण्यात आला. तर शिक्षण क्षेत्रातील महागाई निर्देशांक हा ६.१० टक्के नोंदविण्यात आला आहे. मांस आणि मासे या वर्गवारीत ८.५१ टक्के तर डाळी आणि उत्पादनांमध्ये ६.९४ टक्के महागाईचा निर्देशांक नोंदविण्यात आला. पालेभाज्यामध्ये महागाईचा निर्देशांक हा ६.९ टक्के झाल्याचे दिसून आले.

हेही वाचा-वाहनांवरील जीएसटी कमी करण्याबाबत वित्तीय मंत्रालयाची राज्य सरकारांबरोबर चर्चा सुरू

महागाईच्या आकेडवारीनुसारच आरबीआयचे ठरते पतधोरण-
भारतीय रिझर्व्ह बँक ही द्विमासिक पतधोरण जाहीर करताना ग्राहक किंमत निर्देशांकाचा (सीपीआय) विचार करते. सरकारने महागाईचा निर्देशांक जास्तीत जास्त ४ टक्के व कमीत कमी २ टक्के ठेवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. चालू वर्षात आरबीआयने चार वेळा व्याजदरात कपात केली आहे. आरबीआय पुढील पतधोरण ४ ऑक्टोबरला जाहीर करणार आहे.

हेही वाचा-'बीएमडब्ल्यू'च्या सवारीची हौस करा पुरी; ओलावर आलिशान चारचाकी मिळणार भाड्याने

या राज्यामध्ये महागाई सर्वात जास्त-
आसाममध्ये सर्वात जास्त म्हणजे ५.७९ टक्के महागाईचा निर्देशांक नोंदविण्यात आला. त्यानंतर कर्नाटक ५.४७ टक्के तर उत्तराखंड ५.२८ टक्के नोंदवून तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे चंदीगडमध्ये महागाईचा निर्देशांक वजा पातळीवर म्हणजे उणे ०.४२ एवढा नोंदविण्यात आला. ग्रामीण भागात महागाईचा निर्देशांक हा २.१८ टक्के तर शहरी भागात ४.४९ टक्के ऑगस्टमध्ये नोंदविण्यात आला.

Intro:Body:

marathi business

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.