मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच गव्हर्नर शक्तिकांत दास यांची सही असलेली १० रुपयांची नोट चलनात आणणार आहे. ही नोट महात्मा गांधी (नवी) श्रेणीतील असणार आहे.
नव्या १० रुपयाच्या नोटेची रचना महात्मा गांधी (नवी) श्रेणीतील इतर नोटेप्रमाणे असणार आहे. नवी १० रुपयांची नोट चलनात आल्यानंतर जुन्या १० रुपयाच्या नोटाही पूर्वीप्रमाणे चलनात असणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले. यापूर्वी आरबीआयने ५०, १००, २००, २०, ५०० रुपयाच्या नव्या नोटा चलनात आणल्या आहेत.