ETV Bharat / business

आरबीआय २० हजार कोटींचे सरकारी रोखे करणार खरेदी

सध्याची चलनाची तरलता आणि वित्तीय स्थिती लक्षात घेतला आरबीआयने सरकारी रोखे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. १० फेब्रुवारीला २० हजार कोटी रुपयांचे रोखे खरेदी करण्यात येणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

सरकारी रोखे
सरकारी रोखे
author img

By

Published : Feb 8, 2021, 7:57 PM IST

मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँके खुल्या बाजारातून (ओएमओएस) २० हजार कोटी रुपयांचे रोखे खरेदी करणार आहे. केंद्र सरकारच्या कर्ज घेण्यासाठी मदत व्हावी, म्हणून आरबीआय हे रोखे खरेदी करणार आहे.

सध्याची चलनाची तरलता आणि वित्तीय स्थिती लक्षात घेतला आरबीआयने सरकारी रोखे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. १० फेब्रुवारीला २० हजार कोटी रुपयांचे रोखे खरेदी करण्यात येणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात कर्ज घेण्याचे ठरविले आहे. त्यासाठी आरबीआयकडून केंद्र सरकारला मदत करण्यात येणार आहे.

हेही वाचा-तेजीचा परिणाम: गुंतवणुकदारांच्या संपत्तीत १६.७० लाख कोटींहून वाढ

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मागील आठवड्यात चलनाबाबत धोरण लवचिक ठेवण्यात येणार असल्याचे म्हटले होते. एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात १२.०६ लाख कोटींचे सरकारी रोखे खरेदी करणार असल्याचेही गव्हर्नर दास यांनी म्हटले होते. सरकारकडून वित्तीय व्यवस्थापन करण्यासाठी व वित्तीय तूट कमी करण्यासाठी सरकारी रोखे विकण्यात येतात.

हेही वाचा-सलग पाच दिवसांच्या घसरणीला ब्रेक; सोन प्रति तोळा ९४ रुपयांनी महाग

देशाच्या वित्तीय तुटीत वाढ-

दरम्यान, देशाच्या अर्थव्यवस्थेची वित्तीय तूट अंदाजित आकडेवारीहून १४५.८ टक्क्यांनी वाढली आहे. देशाची वित्तीय तूट डिसेंबर २०२० अखेर वाढून ११.५८ लाख कोटी रुपये राहिले आहे. कोरोना महामारी आणि टाळेबंदीमुळे देशाच्या महसुलावर मोठा परिणाम झाल्याने वित्तीय तूट वाढली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.