ETV Bharat / business

आरबीआय बुधवारी जाहीर करणार पतधोरण, चौथ्यांदा २५ बेसिस पाँईटने व्याजदरात होणार कपात ? - निर्मला सीतारामन

चालू वर्षातील तिसरी  पतधोरण समितीची बैठक ५ ते ७ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. आरबीआयच्या  सहा सदस्यीय पतधोरण समितीचे अध्यक्ष आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे आहेत.

आरबीआय
author img

By

Published : Aug 4, 2019, 5:54 PM IST

नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँक बुधवारी पतधोरण जाहीर करणार आहे. यावेळीही सलग चौथ्यांदा २५ बेसिस पाँईटने व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे. मंदावलेल्या अर्थव्यवस्थेमुळे आरबीआय हा निर्णय घेईल, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

चालू वर्षातील तिसरी पतधोरण समितीची बैठक ५ ते ७ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. आरबीआयच्या सहा सदस्यीय पतधोरण समितीचे अध्यक्ष आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे आहेत. त्यांनी चलनाची तरलता वाढविणे आणि रेपो दरातील कपातीचा ग्राहकापर्यंत फायदा मिळवून देण्यासाठी पावले उचलावीत, अशी तज्ज्ञांची अपेक्षा आहे.

युनियन बँक ऑफ इंडियाचे सीईओ राजकिरण राय.जी. म्हणाले, पतधोरण समिती रेपो दरात २५ बेसिस पाँईटने कपात करण्याची शक्यता आहे. आम्हाला प्रगतीसाठी प्रोत्साहनाची गरज आहे. ते नक्कीच रेपो दरात कपात करतील, अशी आशा आहे.

सीसीआयआयची अशी आहे अपेक्षा-
उद्योगांची संघटना सीआयआयने रेपो दरातील कपातीचा ग्राहकांपर्यंत लाभ देण्याची गरज व्यक्त केली. आरबीआयने रेपो दर ५० बेसिस पाँईटने कमी करावा, अशी सीआयआयने अपेक्षा व्यक्त केली. त्यामुळे व्यवस्थेमध्ये ६० हजार कोटी रुपये खुले होतील, असे ही सीआयआयने म्हटले आहे.

अॅसोचॅमचे असे आहे मत-
आर्थिक विकासदर वाढविण्यासाठी गुंतवणूक वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी कमी दरात वित्तपुरवठा व्हावा अशी अपेक्षा उद्योगांची संघटना अॅसोचॅमने व्यक्त केली. तसेच ग्राहकांकडून होणाऱ्या खर्चाचे प्रमाण वाढल्याने प्रवासी आणि व्यवसायिक वाहनांची विक्री वाढू शकते.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सोमवारी खासगी व सरकारी बँकांच्या प्रमुखांची बैठक घेणार आहेत. महागाईचे प्रमाण आरबीआयने निश्चित केलेल्या मर्यादेत आहे. मात्र वाहन उद्यांगासह इतर महत्त्वाच्या ८ क्षेत्रात मंदी असल्याचे चिन्हे आहेत.

Intro:Body:

DUmmy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.