ETV Bharat / business

'कोरोना महामारीच्या परिणामातून देशाची अर्थव्यवस्था हळूहळू सावरेल'

कोरोनाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. असे असले तरी, त्यामधून अर्थव्यवस्था सावरेल, असा विश्वास आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला.

author img

By

Published : Sep 16, 2020, 1:39 PM IST

संग्रहित-शक्तिकांत दास
संग्रहित-शक्तिकांत दास

नवी दिल्ली - कोरोना महामारीच्या परिणामानंतर देशाची अर्थव्यवस्था हळहळू सुधारू शकेल, असे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. ते फिक्कीच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीच्या बैठकीत बोलत होते. कोरोनाचा अजूनही अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अर्थव्यवस्था हळहळू पूर्वपदावर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कोरोना महामारीचा आर्थिक चलनवलनावर परिणाम झाला होता. दुसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्था सुधारेल, असा आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी विश्वास व्यक्त केला. जागतिक विकासदरात मोठी घसरण होईल, असा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला होता. यावर शक्तिकांत दास म्हणाले की, जागतिक अर्थव्यवस्था सुधारण्याचा मार्ग लांबपल्ल्याचा असणार आहे.

हेही वाचा-टिकटॉकला पर्याय ठरू शकणारे यूट्यूबचे 'शॉर्टस' भारतात लाँच

आरबीआयने सातत्याने मोठ्या प्रमाणात चलनाची उपलब्धता करण्याचे प्रयत्न केले आहेत. केंद्र सरकारकडून घेण्यात येणाऱ्या मोठ्या प्रमाणातील कर्जावरील व्याजदर कमी असेल, यासाठी आश्वस्त करण्यात आले आहे. चलनाची उपलब्धता विविध क्षेत्रांमध्ये करण्यात आल्याने त्याचा चांगला फायदा झाला आहे.

हेही वाचा-ड्रॅगनची देशातील १,६०० कंपन्यांमध्ये चार वर्षात १ अब्ज डॉलरची गुंतवणूक

भारताच्या आर्थिक विकासदर चालू वर्षात ९ टक्क्यांनी घसरणार असल्याचा अंदाज एशियन डेव्हलपमेंट बँकेने (एडीबी) वर्तविला आहे. कोरोना महामारीचा आर्थिक चलनवलनावर आणि देशातील ग्राहकांच्या भावनांवर परिणाम होणार आहे. त्याचाच अर्थव्यवस्थेला फटका बसणार असल्याचे एडीबीने म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.