ETV Bharat / business

कोरोनाने अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम टाळण्यासाठी आरबीआयकडे सर्व पर्याय तयार - Shaktikant Das

येस बँकेतील सर्व ठेवीदारांचे पैसे सुरक्षित आहेत. त्यामुळे पैसै काढण्यासाठी खातेदारांनी घाई करू नये. ठेवीदारांनी चिंताग्रस्त होवू नये, असे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले.

Shaktikant Das
शक्तिकांत दास
author img

By

Published : Mar 16, 2020, 3:04 PM IST

Updated : Mar 16, 2020, 4:47 PM IST

मुंबई - कोरोनामुळे वित्तीय बाजारपेठेवरील परिणाम कमी करण्यासाठी आरबीआयने अनेक पर्याय तयार ठेवले आहेत. रेपो धोरणावरील निर्णय पतधोरणाच्या समितीत घेण्यात येणार असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. आधीच मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला कोरोनाने मोठा फटका बसत आहे. अशा स्थितीत भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास पत्रकार परिषद घेत आहेत.

येस बँकेतील सर्व ठेवीदारांचे पैसे सुरक्षित आहेत. त्यामुळे बँक खात्यामधून पैसै काढण्यासाठी खातेदारांनी घाई करू नये. ठेवीदारांनी चिंताग्रस्त होवू नये, असे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले.

शक्तिकांत दास म्हणाले, खासगी शेड्युल्ड बँकांतील ठेवीदारांचे पैसे आजवरच्या इतिहासात कधीच बुडाले नाहीत. येस बँकेचे अनेक खातेदार एकनिष्ठ राहिले आहेत. काही राज्यांनी खासगी बँकांची खाती बंद केली आहेत. त्यांनी पुन्हा खासगी बँकांवर विश्वास ठेवावा, असे शक्तिकांत दास यांनी आवाहन केले. येस बँकेला चलनाची तरलता भासली तर आणखी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम-

पुढे ते म्हणाले, कोव्हिड ही जागतिक महामारी घोषित करण्यात आली आहे. त्याचा जगभरातील वित्तीय बाजारपेठांवर परिणाम होत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. देशात १०० हून अधिक जणांना कोविड-१९ लागण झाली आहे. कोरोनाने उद्भवलेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार हे युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. कोरोनाचा जागतिक आणि देशातील अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पर्यटन, विमान, आदरातिथ्य आणि प्रवासी वाहतूक क्षेत्रांवर परिणाम होत आहे. हीच परिस्थिती राहिली तर पुनरावलोकन करावे लागणार आहे. अशा स्थितीत आरबीआयने वित्तीय बाजारपेठेतील विश्वास टिकविण्यासाठी निर्णय घेतले आहेत.

  1. स्वॅप अॅक्शन - डॉलरची विक्री करणे. बाजारातील चलनाची तरलता टिकविण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे.
  2. एलटीआरओवर आधारित पतधोरणाचे अवलोकन करण्यात येणार आहे.
  3. गर्दी टाळण्यासाठी डिजीटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी ग्राहकांना जावे लागणार नाही. त्यासाठी बँकांना निर्देश देण्यात येणार आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँक बाजारात हस्तक्षेप करत रेपो दर १५ ते २० बेसिसने कमी करेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, त्यावर निर्णय घेण्यात आला नाही. पतधोरण समितीच त्याबाबत निर्णय घेवू शकते, तसा कायदा असल्याचे शक्तिकांत दास यांनी सांगितले.

अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदर जवळपास शून्य केला आहे. रोख्यांतून सुमारे ७०० अब्ज डॉलर खरेदी करण्याचा निर्णयही अमेरिकेच्या फेडरल बँकेने घेतला आहे. कोरोनाने अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम टाळण्यासाठी असे निर्णय घेण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर आरबीआयकडून काही निर्णय जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

हेही वाचा-येस बँकेच्या कामकाजाची गाडी बुधवारपासून येणार रुळावर

अशी आहे सध्याची परिस्थिती-

  • रुपयाची डॉलरच्या तुलनेत सतत घसरण सुरू आहे.
  • शेअर बाजारातही प्रचंड घसरण होत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
  • कोरोनामुळे देशातील पर्यटन, उत्पादन क्षेत्रासह विविध क्षेत्रांवर परिणाम होत आहे.

हेही वाचा-महामारीचा आर्थिक फटका : गुंतवणूकदारांनी गमाविले ६.२५ लाख कोटी!

Last Updated : Mar 16, 2020, 4:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.